भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहली त्याच्या खेळामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचे नाव जगातील महान फलंदाजांमध्ये घेतले जाते. सोबतच पाकिस्तानचा कर्णधार फलंदाज बाबर आझम याने देखिल गेल्या काही वर्षात आपल्या खेळाने सर्वांना प्रभावीत केले आहे. तुम्हाला माहित आहे का? विराट आणि बाबर हे महान फलंदाज पहिल्यांदा केव्हा आणि कुठे भेटले होते. याचा खूलासा खुद विराटने केला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) स्टार स्पोर्ट्स सोबत बोलताना म्हणाला की, “बाबर आझम (Babar Azam) सोबत पहिली भेट ही 2019 च्या विश्वचषकादरम्यान झाली. आमचे पहिले बोलने मँचेस्टर मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यानंतर झाले होते.”
विराट पुढे म्हणाला की, “मी इमादला अंडर19 च्या विश्वचषकापासून ओळखत आहे. तो मला म्हणाला की, बाबरला माझ्याशी बोलायचे आहे. तेव्हा आम्ही भेटलो आणि बसून क्रिकेट बद्दल गप्पा मारल्या. त्या वेळी बाबरने मला खूप सन्मान दिला आणि तो आत्ताही तेवढाच सन्मान देतो. सध्या तो जगात अव्वल स्थानाचा फलंदाज आहे. त्याने क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याला चांगले खेळताना पाहताना मला आनंद होतो.” असेही विराट म्हणाला.
A bond beyond boundaries!
Here's what @imVkohli had to say about his 1st interaction with @babarazam258 & his genuine admiration for the Pakistani skipper!
Put your #HandsUpForIndia & tune-in to #INDvPAK on #AsiaCupOnStar
Sep 2, Saturday | 2 PM Onwards | Star Sports Network pic.twitter.com/vvkbrePWFe— Star Sports (@StarSportsIndia) August 12, 2023
दोघांची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहली: विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 501 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 559 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 53.63 च्या सरासरीने 25582 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 76 शतके आणि 131 अर्धशतके झळकली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 245* धावा आहे.
बाबर आझम : बाबर आझमने आतापर्यंत 253 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 284 डावांमध्ये त्याने 49.58 च्या सरासरीने 12346 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 30 शतके आणि 82 अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 196 धावा होती. (when virat kohli and babar azam meet first time )
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापूर्वी रोहित सहकुटुंब बालाजी चरणी, कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी
पोलिस कर्मचाऱ्याने फलंदाजाचा उडवला बोल्ड, व्हिडीओ पाहून उंचावतील तुमच्या भुवया