भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एक जबरदस्त फलंदाज म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. 2008 साली मलेशियात 19 वर्षांखालील विश्वचषक झाला होता. त्यावेळी विराटने स्वतः ची ओळख करून देताना प्रोफाईल म्हणून स्वतःचा उल्लेख ‘उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज’ असा केला होता. हा व्हिडीओ आयसीसीने आता ट्वीट केला आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली याने नुकताच त्याचा 32 वा वाढदिवस युएई येथे सुरू असलेल्या आयपीएल हंगामा दरम्यान साजरा केला. विराट कोहलीने भारतीय संघासाठी आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विक्रमी कामगिरी केली आहे. 2008 साली त्याने भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते.
कोहलीने आतापर्यंत भारतीय संघासाठी 248 वनडे सामन्यांत 11867 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये 82 सामन्यांत त्याने 2794 धावा केल्या आहेत, तर कसोटी प्रकारात 86 सामन्यांमध्ये त्याने 7240 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 70 आंतरराष्ट्रीय शतके असून त्यातील 27 शतके कसोटी, तर 43 शतके वनडे सामन्यात ठोकली आहेत. भारतासाठी विराट कोहकी हा एका हिऱ्या प्रमाणे चमकणारा एक महत्त्वाचा खेळाडू आहे.
विराट कोहली एक ख्यातनाम फलंदाज म्हणून मोठा झाला आहे. परंतु कधी काळी त्याने स्वतःची ओळख एक गोलंदाज म्हणून देखील केली होती. 2008 साली मलेशिया येथे झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटातील विश्वचषकात विराट कोहलीने स्वतःची ओळख एक अष्टपैलू खेळाडू म्हणून करून दिली होती. “मी विराट कोहली. उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे,” अशी त्याने स्वतःची ओळख केली होती. हा प्रोफाइल व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.
Remember how your favourite superstars looked like as teenagers? 👦
Presenting the 2008 U19 @cricketworldcup introductions 📽️
Which one’s your favourite? 😄 pic.twitter.com/Sk4wnu4BNs
— ICC (@ICC) November 4, 2020
अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून विराट कोहली ने 2008 चा 19 वर्षांखालील विश्वचषक भारताला जिंकून दिला होता. 6 सामन्यांत एका शतकासह 235 धावा कोहलीने केल्या होत्या. त्याचबरोबर गोलंदाजी करताना 4 बळी देखील कोहलीने घेतले होते. कोहलीने भारतीय संघाच्या मुख्य संघात खेळतानाही वनडे सामन्यांत 4 व टी-20 सामन्यांत 4 बळी घेतले आहेत. आयपीएल मध्येही विराट कोहलीने 4 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-आनंदाची बातमी! ‘या’ छोट्या शहरात सुरु होतेय एमएस धोनीची क्रिकेट अकॅडेमी
-नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ
-“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली
ट्रेंडिंग लेख-
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा
-बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार