इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना येत्या १९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ युएईला पोहचले असून सर्वच संघांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिलीच लढत आयपीएलच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि ३ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये पार पडणार आहे.
चला तर जाणून घेऊया हा सामना कुठे,कधी आणि कसा पाहू शकाल.यासह दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हेनमध्ये कुठले खेळाडू असतील.
केव्हा सुरू होणार इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात?
युएईमध्ये येत्या १९ सप्टेंबर पासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील पहिली लढत कोणत्या दोन संघांमध्ये रंगणार आहे?
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिली लढत १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना किती वाजता सुरू होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे.
कुठे खेळले जाणार इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने?
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने दुबईच्या,दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी मधील शेख जायद स्टेडियम आणि शारजाहाच्या शारजाहा क्रिकेट स्टेडियमवर या ३ ठिकाणी पार पडणार आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना लाईव्ह कसा पाहाल?
क्रिकेट चाहत्यांना ८ भाषांमध्ये आयपीएल स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. हे प्रसारण स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर केले जाणार आहे. दरम्यान हिंदी आणि इंग्लिशसह ६ प्रादेशिक भाषांमध्ये स्पर्धेचे प्रसारण केले जाणार आहे. तसेच ही स्पर्धा हॉटस्टारवर देखील पाहायला मिळणार आहे. परंतु, हॉटस्टारवर ही स्पर्धा पाहण्यासाठी चाहत्यांना वार्षिक किंवा मासिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.
दोन्ही संघांची अशी असू शकते संभावित प्लेइंग इलेव्हेन
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कूल्टर नाइल/जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक ), रवींद्र जडेजा, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी आणि दीपक चाहर.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ पाच भारतीय फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर आयपीएलमध्ये पडलाय षटकारांचा पाऊस, सर्व दिग्गजांचा समावेश
अनिल कुंबळे पुन्हा बनणार भारतीय संघाचे प्रशिक्षक? ‘हा’ दिग्गजही शर्यतीत
तयारी आयपीएलची! क्वारंटाईन पूर्ण करत विराट-सिराज परतले मैदानात, संघासह सरावास सुरुवात, पाहा व्हिडिओ