WPL Auction 2024: क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करण्यासाठी महिला प्रीमिअर लीग 2024 सज्ज झाली आहे. डब्ल्यूपीएल 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचा लिलाव शनिवारी 9 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. यावेळी लिलावात एकूण 165 खेळाडूंवर बोली लावली जाईल. यामध्ये 104 भारतीय आणि 61 परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. चला तर, या लिलावाविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…
डब्ल्यूपीएल 2024 लिलाव (WPL 2024 Auction) पक्रियेत सहभागी होणाऱ्या 61 परदेशी खेळाडूंमध्ये 15 सहयोगी देशांच्या खेळाडूही असतील. डब्ल्यूपीएल 2024 (WPL 2024) स्पर्धेला पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. लिलावानंतर रॉजर बिन्नी (Roger Binny) अध्यक्ष असलेल्या बीसीसीआय (BCCI) बोर्डाकडून याविषयी लवकरच घोषणा केली जाईल.
🥁 𝐌𝐚𝐫𝐤 𝐲𝐨𝐮𝐫 𝐂𝐚𝐥𝐞𝐧𝐝𝐚𝐫𝐬!
🔨 #TATAWPL Auction
🗓️ 9th December 2023
📍 Mumbai pic.twitter.com/rqzHpT8LRG
— Women's Premier League (WPL) (@wplt20) November 24, 2023
लिलावात सामील झालेल्या 5 संघांमध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांकडे एकूण 30 जागा रिकाम्या आहेत. यातील 9 जागा परदेशी खेळाडूंच्या आहे. आता हे पाहणे रंजक ठरेल की, या 165 खेळाडूंपैकी कोणते 30 खेळाडूंचे नशीब चमकते.
चला तर डब्ल्यूपीएल लिलावाशी संबंधित काही माहितीवर आपण नजर टाकूयात…
कुठे आणि केव्हा होणार डब्ल्यूपीएल 2024 लिलाव?
महिला प्रीमिअर लीग 2024 लिलाव (Women’s Premier League Auction 2024) शनिवारी (दि. 9 डिसेंबर) मुंबईत होणार आहे.
डब्ल्यूपीएल 2024 लिलाव किती वाजता सुरू होईल?
डब्ल्यूपीएल 2024 लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरुवात होईल.
टीव्हीवर कुठे पाहता येईल?
डब्ल्यूपीएल 2024 लिलावाचे लाईव्ह प्रसारण टीव्हीवर स्पोर्ट्स 18च्या वेगवेगळ्या चॅनेलसोबतच कलर्स सिनेप्लेक्सवरही हिंदी भाषेत पाहता येईल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कशी पाहायची?
डब्ल्यूपीएल 2024 लिलावाची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ऍपवर मोफत पाहता येईल.
किती खेळाडूंवर लागणार बोली?
यावेळी एकूण 165 खेळाडूंवर बोली लावली जाईल. यामध्ये सर्वाधिक 104 भारतीय, तर 61 परदेशी खेळाडूंचा समावेश असेल.
डब्ल्यूपीएल लिलावात कोणत्या संघाकडे किती स्लॉट बाकी?
दिल्ली कॅपिटल्स
खेळाडूंची संख्या- 15, परदेशी खेळाडूंची संख्या- 5, एकूण पैसा खर्च- 11.25 कोटी, शिल्लक रक्कम- 2.25 कोटी, उपलब्ध स्लॉट- 4, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- 1
गुजरात जायंट्स
खेळाडूंची संख्या- 08, परदेशी खेळाडूंची संख्या- 3, एकूण पैसा खर्च- 7.55 कोटी, शिल्लक रक्कम- 5.95 कोटी, उपलब्ध स्लॉट- 10, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- 3
मुंबई इंडियन्स
खेळाडूंची संख्या- 13, परदेशी खेळाडूंची संख्या- 5, एकूण पैसा खर्च- 11.4 कोटी, शिल्लक रक्कम- 2.1 कोटी, उपलब्ध स्लॉट- 5, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- 1
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
खेळाडूंची संख्या- 11, परदेशी खेळाडूंची संख्या- 3, एकूण पैसा खर्च- 10.15 कोटी, शिल्लक रक्कम- 3.35 कोटी, उपलब्ध स्लॉट- 7, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- 3
यूपी वॉरियर्स
खेळाडूंची संख्या- 13, परदेशी खेळाडूंची संख्या- 5, एकूण पैसा खर्च- 9.25 कोटी, शिल्लक रक्कम- 4 कोटी, उपलब्ध स्लॉट- 5, परदेशी खेळाडूंचा स्लॉट- 1 (when where and how to watch wpl auction 2024 know date time live telecast live streaming venue here)
हेही वाचा-
गंभीरशी भांडण करणं श्रीसंतला पडलं महागात! LLC कमिशनरने पाठवली लीगल नोटीस; म्हणाले, ‘जोपर्यंत तू…’
कहर बॅटिंग, इतिहास घडला! टी10 क्रिकेटमध्ये फलंदाजाने 43 चेंडूत चोपल्या 193 धावा, सिक्सचा आकडा पाहून शॉकच बसेल