आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनी याचा पूर्ण परिवार स्टेडियम मध्ये आज उपस्थित होता. त्याचे आई-वडील, पत्नी साक्षी धोनी आणि त्याची मुलगी सुद्धा चेपॉक स्टेडियममध्ये उपस्थित होते. जेव्हा धोनीच्या परिवारासोबतचे फोटो समोर आले तेव्हा पासून धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. आता चेन्नई सुपर किंग्स हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी खुलासा केला आहे. काय ते जाणून घेऊया.
दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स वर 25 धावांनी विजय मिळवल्यानंतर पोस्ट मॅच कॉन्फरन्स मध्ये स्टीफन फ्लेमिंग यांना माहीच्या निवृत्ती बद्दल प्रश्न विचारण्यात आला. याच्या उत्तरात त्यांनी म्हटले आहे की, हे माझं काम नाही की, मी त्याच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देऊ. मला याची काही कल्पना नाही. मी त्याच्यासोबत काम करत आताही आनंद घेत आहे. तो आताही चांगलंच खेळत आहे मी या गोष्टीबद्दल त्याला विचारत नाही.
दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्स समोर 184 धावांचं लक्ष ठेवलं होतं. चेन्नई संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि पंधराव्या षटकात संघाने 100 धावांचा आकडा पार केला. धोनी 11 व्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा चेन्नईला 56 चेंडूत 110 धावांची जिंकण्यासाठी गरज होती. तेव्हा विजय शंकर खेळपट्टीवर चांगला खेळत होता आणि धोनी 43 वयामध्ये तुफानी पारी खेळण्यासाठी अजूनही सक्षम आहे. अशातच चेन्नईने अगदी सहजपणे विजय मिळवायला हवा होता.
पण धोनीने फलंदाजी करूनही चेन्नई संघ 10 षटकात फक्त 84 धावा करू शकला. धोनीने केवळ 115 च्या स्ट्राइक रेटने 26 चेंडूत फक्त 30 धावा केल्या. तसेच विजय शंकरला पाहून असे वाटले की, तो टी20 मध्ये कसोटी फलंदाजी करत आहे त्याने 128 खेळत 54 चेंडूत 69 धावा केल्या.