चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तान संघ बाहेर पडल्यानंतर, प्रतिक्रियांचा सिलसिला सुरूच आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू, मोहम्मद रिझवान त्याच्या नेतृत्वाखालील संघावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्याचवेळी, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याचा सहकारी मोहम्मद हफीजवर निशाणा साधला आहे. प्रत्यक्षात, मोहम्मद हफीजने एका टीव्ही शोमध्ये म्हटले होते की पाकिस्तानमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. यानंतर शोएब अख्तर संतापले. मोहम्मद हफीजच्या विधानावर शोएब अख्तर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानचे माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हफीज म्हणाले की, आपल्या देशात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही, पण आपल्याकडे खेळण्याची कोणतीही खासियत नाही. शोएब अख्तरने मोहम्मद हफीजचे म्हणणे ऐकले. यानंतर शोएब अख्तर यांनी मोहम्मद हफीजला प्रश्नाच्या स्वरात विचारले, “पाकिस्तानमध्ये प्रतिभा कुठे आहे?” मोहम्मद हफीज पुढे म्हणाले की, पाकिस्तानकडे प्रतिभा आहे. या दरम्यान, शोएब अख्तर यांनी पाकिस्तानी संघावर जोरदार हल्ला चढवला. विशेषतः पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानवर हल्ला केला.
शोएब अख्तर म्हणाले, मोहम्मद रिजवान कडे कोणतं टॅलेंट आहे? टॅलेंट आपोआप दिसतं, ते सांगायला लागत नाही. मी हे 20 वर्षांपासून ऐकतोय परंतु, कोणीच टॅलेंटेड नाहीये. जर कोण असतं तर दिसलं असत मागील 10 वर्षात. सोशल मीडियावर शोएब अख्तर यांचे वक्तव्य वेगाने व्हायरल होत आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड पाठोपाठ भारताने पाकिस्तानचा पराभव केला.
महत्वाच्या बातम्या :
इब्राहिम झादरानने ठोकले शतक, अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर उभारला 326 धावांचा डोंगर
भारतीय संघासोबतच या संघाला मिळाले उपांत्य फेरीत स्थान, हे 2 संघ झाले स्पर्धेतून बाहेर
आयपीएल 2025 पूर्वी करूण नायरचा मोठा धमाका! देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी






