टीम इंडियाचा एक असा गोलंदाज आहे, ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच खळबळ उडवून दिली होती. परंतु निवडकर्त्यांनी या खेळाडूला दुधातील माशी फेकल्याप्रमाणे भारतीय संघातून वगळलं. या गोलंदाजाकडे श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यासारखेच घातक यॉर्कर फेकण्याची क्षमता आहे. मात्र अजूनही त्याला भारतीय संघात पाहिजे तशी संधी मिळालेली नाही.
आम्ही बोलतोय ‘यॉर्कर मॅन’ म्हणून ओळखला जाणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्याबद्दल. नटराजन गेल्या 3 वर्षांपेक्षा अधिक काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यानं भारतीय संघासाठी शेवटचा सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या या टी20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर निवडकर्त्यांनी टी. नटराजनकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं.
टी. नटराजन यानं भारतासाठी 1 कसोटी, 4 टी20 आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानं कसोटीत 3 बळी, टी20 मध्ये 7 बळी आणि एकदिवसीयमध्ये 3 बळी घेतले आहेत. आयपीएल 2020 मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे नटराजनला टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून त्यानं आयपीएलमध्ये सातत्यानं शानदार कामगिरी केली आहे. मात्र तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. नटराजननं आयपीएलच्या 61 सामन्यांमध्ये 67 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची इकॉनॉमी 8.84 एवढी राहिली.
33 वर्षीय वेगवान गोलंदाज टी. नटराजननं 2020-2021 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं होतं. तो अचूक यॉर्कर टाकण्यात माहिर आहे. त्यामुळे तो फलंदाजांसाठी अत्यंत धोकादायक ठरतो. टी. नटराजन याला अजूनही भारतीय संघात परतण्याची आशा आहे, परंतु निवडकर्ते काय विचार करतात, यावर सगळ अवलंबून आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जय शाह आता अधिक शक्तिशाली होणार! बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाण्याच्या चर्चांना वेग
जेम्स अँडरसन कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत रचणार इतिहास! अशी कामगिरी करताच बनेल मोठा विक्रम
ईशान किशननं रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार का दिला होता? समोर आलं धक्कादायक कारण