आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरूवात व्हायला आता फक्त एकच दिवस बाकी आहे. तसेच सर्व संघांनी आयपीएल 2024 (IPL 2024) साठी जोरदार तयारी केली असून आता स्पर्धेला सुरूवात होण्याची सगळेजण वाट पाहत आहे. आयपीएलचा 17 वा हंगाम हा 22 मार्चपासून सुरू होत आहे. यंदाच्या हंगामात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल करण्यात आले आहे. यामुळेच गतविजेत्या आणि उपविजेत्या संघातील सलामीचा सामना यावेळी होणार नाही.
याबरोबरच, 22 मार्चला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात होणार आहे. तसेच आयपीएलच्या 17 व्या हंगामात अनेक गोष्टी वेगळ्या होणार आहेत. अनेक खेळाडू हे पुनरागमन करणार आहेत. तर टी 20 वर्ल्डकपच्या तोंडावर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्नशील असणार आहेत. यात विराट कोहलीपासून इशान किशन पर्यंत अनेकांचा समावेश आहे. तसेच ऋषभ पंत कितपत फिट झाला आहे.
अशातच विराट कोहली अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे विराट कशी कामगिरी करतो हे पहावे लागणार आहे. त्याचबरोबर धोनी देखील वर्षानंतर आणि गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर मैदानावर उतरणार आहे. यापूर्वी आयपीएल उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बॉलीवूड स्टार अक्षय कुमार, टायगर श्रॉफ गायक सोनू निगम आणि संगीतकार ए.आर. रेहमान हे आपली कला सादर करणार आहेत. तर हा कार्यक्रम चिदंबरम स्टेडियमवर सायंकाळी 6.30 मिनिटांनी सुरू होणार आहे.
Pitch pe toh Jasprit bowling karega
Lekin ghar pe sirf JioCinema dekhega.Aap bhi 22nd March ko JioCinema par #CSKvRCB ka poora mazaa lena, free mein!#TVDekhoTohAise#IPLonJioCinema, streaming free from 22nd March#IPL2024 #TataIPL pic.twitter.com/Ih4TV7tqIY
— JioCinema (@JioCinema) March 15, 2024
दरम्यान, आयपीएलमधील संपूर्ण सामने हे मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येतील. यासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. तसेच मराठी, हिंदी, इंग्रजीसह अन्य स्थानिक भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना सामन्यासह आपल्या भाषेत कॉमेंट्रीची मजा घेता येणार आहे. तसेच सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येणार आहेत. याबरोबरच, आयपीएलमधील दुपारचे सामने 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तर संध्याकाळचे सामने 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- अर्रर्र..रिंकूचा नादचं खुळा! 24 कोटींच्या स्टार्कला रिंकू सिंगने दाखवलं आभाळ, पाहा व्हिडिओ
- “७०व्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डी” स्पर्धेकरिता अहमदनगरचे वाडिया पार्क सज्ज! महाराष्ट्राच्या कामगिरीकडे सर्व कबड्डीप्रेमींचे लक्ष