गोरगन, इराण । येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष आणि महिलांचा आज इराणला रवाना झाला. ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन, इराण येथे होणार आहे.
भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व अनुभवी अजय ठाकूर तर महिला संघाचे नेतृत्व मराठमोळी अभिलाषा म्हात्रे करत आहे.
ह्या वेळापत्रकाबद्दलचा संभ्रम काल रात्री दूर झाल्यानंतर आता कबड्डीप्रेमींना वेध लागले होते ते हे सामने कुठे पाहायला मिळणार याचे? गेले अनेक दिवस कबड्डीप्रेमी याबद्दल विचारणा करत होते. परंतु आयोजन समिती किंवा अन्य घटकांकडून याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती.
परंतु आज याबद्दलचा संभ्रमही दूर झाला आहे. इराण देशातील आरबीस्ट इरानीयान चॅनेल ३ (Arabsat Iranian Channel 3 ) आणि वारझेश टीव्ही( Varzesh) वर हे सामने लाईव्ह टेलिकास्ट अर्थात थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत.
या दोनही चॅनेलच्या अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे आहेत.
Arabsat Iranian Channel 3- http://www.arabsat.com/english/home
Varzesh- http://www.varzesh3.com/
भारतातील कबड्डीप्रेमी या दोन चॅनेलच्या ऑनलाईन माध्यमांवर भारतात या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. सूत्राच्या म्हणण्यानुसार हे सामने इंस्टाग्रामच्या माध्यमातूनही थेट दाखवले जाणार आहेत.
भारतात कोणत्या चॅनेलवर अथवा वाहिनीवर हे सामने होणार आहे याबद्दल काहीही अधिकृत माहिती नाही.सध्यातरी कबड्डीप्रेमींना ऑनलाईन माध्यमांवरच हे सामने पाहता येऊ शकतात.