---Advertisement---

वनडे कर्णधार म्हणून एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? टॉप-5 च्या यादीत आहेत ‘हे’ 3 भारतीय

On: रविवार, ऑगस्ट 31, 2025 6:33 PM
---Advertisement---

एका वनडे सामन्यात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने हा विक्रम 2011 साली केला होता. गेल्या 14 वर्षांपासून हा विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडता आलेला नाही. सेहवागशिवाय या यादीत आणखी दोन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. तसेच या यादीत श्रीलंकेचा एक आणि वेस्ट इंडिजचा एक फलंदाज आहे.

भारतीय दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सेहवागने हा विक्रम 2011 साली केला होता. आज 14 वर्षांनंतरही हा विक्रम कोणी मोडू शकलेला नाही. सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली होती. या खेळीतून सेहवागने सनथ जयसूर्या यांच्या नावे असलेला कर्णधार म्हणून सर्वात मोठ्या डावाचा 11 वर्षांचा विक्रम मोडला होता.

भारतीय दिग्गज फलंदाज रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 2017 साली श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक खेळी खेळली होती. रोहितने श्रीलंकेविरुद्ध नाबाद 208 धावांची खेळी साकारली होती.

श्रीलंकेचे महान फलंदाज सनथ जयसूर्या यांचं नावही या यादीत आहे. जयसूर्याने 2000 साली भारताविरुद्ध ऐतिहासिक शतक केले होते. त्यांनी तब्बल 189 धावांची खेळी केली होती. हा विक्रम तब्बल 11 वर्षे जयसूर्याच्या नावावर होता. मात्र 2011 साली सेहवागने हा विक्रम मोडत आपल्या नावावर केला.

भारतीय दिग्गज फलंदाज आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. सचिनने 1999 साली न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार म्हणून नाबाद 186 धावांची खेळी साकारली होती.

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विवियन रिचर्ड्स या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. रिचर्ड्सने 1987 साली श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला होता, जेव्हा त्यांनी 181 धावांची खेळी खेळली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---