भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी बीसीसीआयने एकदिवसीय आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० संघाची घोषणा गुरुवारी (१४ जुलै) केली गेली असून, एकदिवसीय मालिकेसाठीचा संघ आधीच जाहीर झालेला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आर अश्विन, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना पुनरागमनाची संधी मिळू शकते. केएल राहुल संघात पुन्हा सामील झाल्यानंतर सलामीसाठी कोण येणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ रोहित शर्माच्याच नेतृत्वात खेळणार आहे, तर एकदिवसीय मालिकेत मात्र शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधार बनवले गेले आहे. केएल राहुल (KL Rahul) जरी दुखापतीनंतर टी-२० संघात पुन्हा सहभागी झाला असला, तरी त्याच्या फिटनेसविषयी अद्याप कसलीही खात्री दिली गेली नाहीये. अशात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल डावाची सुरुवात करतील, याची खूपच कमी शक्यता आहे.
इशान किशन (Ishan Kishan) सध्या वेस्ट इंडीविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी प्रमुख दावेदार आहे. इशानचा सध्याचा फॉर्मही चांगला असल्यामुळे संघ व्यवस्थापन त्याला सलामीसाठी पाठवू शकते. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) देखील सलामीसाठी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला सालामीवीराची जाबाबदारी सोपवली गेली होती.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा नाणेफेकीत रोहितचीच बाजी, सलग दुसरी वनडे जिंकत इतिहास रचण्याचे लक्ष्य; पाहा प्लेइंग इलेव्हन
आयसीसी क्रमवारीत अव्वल असलेला जसप्रीत बुमराह विंडीजच्या दौऱ्यातून बाहेर, कारण माहितीय का?
क्रिकेटविश्वावर शोककळा, माजी भारतीय दिग्गजाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन