न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका 0-3 ने गमावल्यानंतर टीम इंडिया आता बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणाऱ्या सामन्यानं होईल.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. भारतीय संघाला या मालिकेत किमान 4 सामने जिंकावे लागतील. आता मालिका सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितलं की, टीम इंडियात कोणते फलंदाज आहेत जे कसोटी सामना वाचवण्यासाठी 11 तास फलंदाजी करू शकतात.
‘जिओ सिनेमा’वर दिलेली गौतम गंभीरची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाखतीत गंभीरला विचारण्यात आलं की, या भारतीय संघातील कोणता खेळाडू कसोटी सामना वाचवण्यासाठी 11 तास फलंदाजी करू शकतो? यावर गंभीर म्हणाला, ‘टॉप 7 फलंदाज.’ सध्या भारताच्या कसोटीतील टॉप सात फलंदाजांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल आणि सरफराज खान यांचा समावेश आहे.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी मालिकेत पंतशिवाय इतर खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाही. विराट, रोहित आणि राहुलसारख्या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांनी आणि क्रीडा तज्ज्ञांनी जोरदार टीका केली. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांत हिटमनला केवळ 91 धावा करता आल्या. त्याचवेळी कोहलीच्या बॅटमधून केवळ 93 धावा निघाल्या.
केएल राहुलला या मालिकेत एक सामना खेळायला मिळाला, ज्यामध्ये तो केवळ 12 धावा करू शकला. राहुलचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात त्यानं अनुक्रमे 4 आणि 10 धावा केल्या. यादरम्यान गंभीरला विचारण्यात आलं की, सध्याच्या भारतीय संघातील कोणता फलंदाज सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलला सर्वोत्तम खेळू शकतो? यावर गंभीर म्हणाला की टॉप-6 फलंदाज.
हेही वाचा –
आरसीबीनं रिलिज केल्यानंतर दोन आठवड्यातच ठोकलं त्रिशतक! मेगा लिलावात या खेळाडूवर लागू शकते मोठी बोली
दोन फलंदाजांनी ठोकलं नाबाद त्रिशतक! रणजी इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूला मेगा लिलावात 10 कोटी रुपये मिळणार, डेल स्टेनचा अंदाज