आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहते नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतील. पण त्याआधी सर्व संघाच्या चाहत्यांना मेगा लिलावाची (Mega Auction) उत्सुकता लागली असेल. यंदाचा आयपीएल मेगा लिलाव (24 ते 25 नोव्हेंबर) दरम्यान सोदी अरेबिया जेद्दाह येथे होणार आहे. या आयपीएल मेगा लिलावासाठी केवळ 574 खेळाडू निवडले गेले आहे. दरम्यान आयपीएल 2025 मधील सर्वात महागडा खेळाडू कोण असेल?
तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आयपीएल 2008 ते 2024 या कालावधीत प्रत्येक वेळी लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला हे जाणून घेऊया.
आयपीएल 2008- 2008च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) 9.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2009- आयपीएल 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) केविन पीटरसनला (Kevin Pietersen) आणि चेन्नई सुपर किंग्जने (CSK) अँड्र्यू फ्लिंटॉफला 9.8 कोटींना विकत घेतले होते.
आयपीएल 2010- आयपीएल 2010 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) शेन बाँडला आणि मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डला 4.8 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2011- 2011च्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (Gautam Gambhir) गौतम गंभीरला (Gautam Gambhir) 14.9 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2012- 2012च्या आयपीएलमध्ये मध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) 12.8 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2013- आयपीएल 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) 6.3 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2014- आयपीएल 2014 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangaluru) युवराज सिंगला (Yuvraj Singh) 14 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
आयपीएल 2015- आयपीएल 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने (DD) युवराज सिंगला 16 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
आयपीएल 2016- शेन वॉटसनला (Shane Watson) आयपीएल 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 9.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2017- रायझिंग पुणे सुपरजायंटने आयपीएल 2017 मध्ये बेन स्टोक्सला (Ben Stokes) 14.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2018- राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2018 मध्ये बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2019- आयपीएल 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने (RR) जयदेव उनाडकटला आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने वरुण चक्रवर्तीला 8.4 कोटी रुपयांना खरेदी केले होते.
आयपीएल 2020- कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल 2020 मध्ये पॅट कमिन्सला (Pat Cummins) 15.5 कोटींना खरेदी केले होते.
आयपीएल 2021- राजस्थान रॉयल्सने (RR) आयपीएल 2021 मध्ये ख्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2022- आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने (MI) ईशान किशनला (Ishan Kishan) 15.25 कोटींना खरेदी केले होते.
आयपीएल 2023- आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जने (Punjab Kings) सॅम करनला (Sam Curran) 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आयपीएल 2024- आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Mega Auction; “रिषभ पंतला लिलावात 25 ते 30 कोटी…” दिग्गज क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
IPL Mega Auction; ‘हे’ अष्टपैलू खेळाडू ठरणार सर्वात महागडे! माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
भारताने तिसऱ्यांदा पटकावले चॅम्पियन्स ट्राॅफीचे विजेतेपद! फायनलमध्ये चीनचा उडवला धुव्वा