कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे क्रिकेटपटू चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावरून लाईव्ह चॅट करत आहेत. अशाच प्रकारे भारतीय संघाचे क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि इरफान पठान हे खेळाडू इंस्टाग्राम लाईव्ह चॅट करत होते.
या दरम्यान इरफानने शमीला इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या २०१९ वनडे विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्ध घेतलेल्या ऐतिहासिक हॅट्रिकबद्दल विचारले. यावर शमीने हॅट्रिक घेण्यासाठी केलेल्या योजनेबद्दल सांगितले आहे. Planning of historic hat-trick
यावेळी शमी म्हणाला की, “तो सामना खूप चुरशीचा होता. त्या सामन्यात अफगाणिस्तानने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे सामना अटीतटीचा झाला होता.”
शमीने ५० व्या षटकातील ३रा चेंडू टाकत होता. त्यावेळी मोहम्मद नबी फलंदाजी करत होता. नबीने लाँग ऑनच्या दिशेने चेंडू मारला. परंतु भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने हा झेल झेलला आणि भारताला ८वी विकेट मिळाली.
यानंतर शमीने टाकलेला ४ था यॉर्कर चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात अफ्ताब आलम त्रिफाळाचीत झाला. याबरोबर भारताला ९ वी विकेट मिळाली होती. त्यानंतर ५ वा चेंडू टाकायला आल्यानंतर त्याने एमएस धोनीशी (MS Dhoni) चर्चा केली.
याबद्दल या लाईव्ह चॅटदरम्यान बोलताना शमी म्हणाला की, “अंतिम षटकातील ५ वा चेंडू टाकायचा होता. त्यावेळी तो हॅट्रिक चेंडू होता. म्हणून एमएस धोनी माझ्या जवळ आला. धोनी मला म्हणाला की, काय झालं? तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय. त्यावेळी म्हणालो की, काही नाही माही भाई. फक्त ३ स्टंप्स दिसत आहेत. तेव्हा धोनी म्हणाला की, तू चांंगली गोलंदाजी करत आहेस.”
“आतापर्यंत जसे केले आहे तसेच कर. परंतु चेंडू जोरात टाक. मी म्हणालो हो. धोनीच्या जाताच मी निश्चय केला की चेंडू १४० किमीपेक्षा अधिक वेगाने टाकायचा आहे. मी हेच केले आणि मुजीब उर रहमान त्रिफळाचीत झाला,” असेही शमी यावेळी म्हणाला.
यावेळी शमीने इरफानला हसत हसत सांगितले की, “मला माहिती होते की, १४० पेक्षा अधिक वेगाने चेंडू असतो तेव्हा चांगल्या चांगल्या गोलंदाजांनाही तो समजत नाही. मुजीब हा तर गोलंदाज होता. त्यामुळे तो बाद झाला.”
अशाप्रकारे हा सामना अफगाणिस्तानच्या पारड्यात जाणार होता, परंतु भारताकडून गोलंदाजी करताना शमीने (Mohammed Shami) आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने हॅट्रिक घेत भारताला ११ धावांनी विजय मिळवून दिला होता. हा भारताचा विश्वचषकातील चौथा विजय होता.
त्यावेळी वनडे विश्वचषकात हॅट्रिक (Hattrick) घेणारा शमी हा भारताचा दुसरा आणि जगातील ९वा गोलंदाज बनला होता. यापूर्वी भारताकडून चेतन शर्माने १९८७ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध नागपूर येथे हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एका संघाला विश्वचषक जिंकून दिलेला प्रशिक्षक होणार बडोद्याचा महागुरु
-भारताने पाकिस्तानला दिला धोबीपछाड , थेट विश्वचषकाला पात्र
-गर्लफ्रेंड की शेजारी? चहलच्या प्रश्नाने गोंधळला शमी