सध्या बांगलादेशचा पाकिस्तान दौरा सुरु आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना रावलपिंडीत खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या पहिल्या 3 विकेट्स अवघ्या 16 धावांत गेल्या होत्या, मात्र येथून सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या विकेटसाठी 261 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. पाकिस्ताननं 448 धावांवर डाव घोषित केला आणि रिझवान 171 धावा करून नाबाद परतला. रिझवान तंबूत परतत असताना त्यानं बॅट बाबर आझमच्या (Babar Azam) दिशेनं फेकली.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मोहम्मद रिझवान (Mohammwd Rizwan) 171 धावांची खेळी खेळून तंबूत परतत आहे. बाबर सीमेजवळ उभा आहे आणि त्यानंतर रिझवाननं बाबरच्या दिशेने बॅट हवेत फेकली. दोघंही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले, तर रिझवानच्या या शानदार खेळीबद्दल संघातील इतर खेळाडू टाळ्या वाजवताना दिसले.
Muhammad Rizwan threw his bat towards Babar Azam after the innings was declared.
They are always having fun 😂❤️#PAKvBAN #PakistanCricket pic.twitter.com/Sbwfq6LHPN— Rao kashif (@raokash) August 22, 2024
पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी पहिला डाव 448 धावांवर घोषित केला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं नाबाद 171 धावा केल्या, तर सौद शकीलनं 141 धावांची शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय सॅम अयुबनंही 56 धावांची खेळी करत संघाला महत्त्वपूर्ण योगदान दिलं. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशनं 5 गड्यांच्या मोबदल्यात 316 धावा केल्या आहेत. बांगलादेश अजून 132 धावांनी मागे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेसमध्ये सामील होणार विनेश फोगट? भूपिंदर सिंह हुड्डानं केलं मोठं वक्तव्य!
असे 3 खेळाडू, ज्यांच्यासाठी दुलीप ट्रॉफी ठरू शकते टर्निंग पॉइंट; टीम इंडियात मिळू शकते जागा
DPL 2024: सेंट्रल दिल्ली संघानं उडवला रिषभ पंतच्या संघाचा धुव्वा