आयपीएलचा १५ वा हंगाम मार्चमध्ये खेळला जाणार आहे. त्याचा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडला. यावर्षीच्या हंगामात दोन नवे संघ उतरले आहेत. या लिलावाच्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली. तसेच १० मार्की खेळाडूंसाठी (marquee players) सुद्धा मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. श्रेयस अय्यरसाठी (Shreyas ayyar) जवळजवळ सर्वच संघांनी बोली लावली होती. शेवटी दिल्ली, बेंगलोर आणि कोलकत्ता संघांमध्ये सामना झाल्यानंतर त्याला कोलकत्ता संघाने १२.२५ कोटींना विकत घेतले. तसेच पंजाब, लखनऊ, गुजरात, चेन्नई या संघांनी सुद्धा अय्यरवर बोली लावली होती.
अय्यर व्यतिरीक्त शिखर धवन, डेव्हिड वाॅर्नर, ट्रेंट बोल्ट, फाक डू प्लेसिस आणि कगिसो रबाडा या मार्की खेळाडूंसाठी सुद्धा संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. कोलकत्ता संघाला एक उत्तम कर्णधार आणि मधल्या फळीतील फलंदाज मिळाला आहे. याअगोदर श्रेयसने दिल्ली संघाचे कर्णधारपद भुषवले असून त्याला कर्णधारपदाचा अनुभव आहे. पॅट कमिन्सला सुद्धा केकेआरने ७.२५ कोटींना विकत घेतले आहे. या दोनच मार्की खेळाडूंसाठी कोलकत्ताने तब्बल २० कोटी खर्च केले.
विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर आता आरसीबी संघाला एका कर्णधाराची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असलेला फाफ डू प्लेसिसला आरसीबी संघाची कमान मिळण्याची शक्यता आहे. आरसीबीने ७ कोटी रुपयांना फाफ डु प्लेसिसला विकत घेतले आहे. तसेच पंजाब किंग्ज संघाने शिखर धवनवर पहिली बोली लावत ८.२५ कोटींना विकत घेतले आहे. त्यामुळे आता केएल राहूलनंतर पंजाबचा कर्णधार धवन होण्याची शक्यता आहे. तसेच मयंक अग्रवालसोबत तो सलामीला येऊ शकतो. पंजाबने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाजी कगीसो रबाडाला ९.२५ कोटींना विकत घेतले आहे. पंजाबने हे दोन खेळाडू १७.५० कोटींमध्ये घेतले आहेत.
राजस्थान रॉयल्सने आर अश्विन आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना केवळ १३ कोटी रुपयांमध्ये संघाशी जोडले. राजस्थानच्या गोलंदाजीवर अनेकदा टीका होत असते. यावेळी मेगा लिलावात या संघाने कमी खर्चात आपल्यासोबत २ सर्वोत्तम गोलंदाज जोडले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने क्विंटन डी कॉकला केवळ ६.७५ कोटींमध्ये खरेदी केले आहे तसेच गुजरातने मोहम्मद शमीला ६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. वॅार्नरला दिल्लीने ६.२५ कोटींना विकत घेतले आहे.
मार्की खेळडूच्या यादीत दिल्ली, राजस्थान, बेंगलोर, पंजाब या संघांनी कमी खर्चात चांगल्या खेळाडूंची निवड केली आहे. आता संघात मार्की खेळाडू सोडून बाकी खेळाडूंवर बोली लावली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
अनपेक्षित गोष्ट घडल्याने घाबरली शाहरुखची सुहाना! फोटो होतोय व्हायरल (mahasports.in)
आयपीएल लिलावातही शाहरुख ‘सुपरहिट’! तब्बल ९ कोटी रुपयांमध्ये ‘या’ संघात झाला सामील (mahasports.in)