इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात शनिवारी (०९ जुलै) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. इंग्लंडकडून या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. वयाच्या ३४ व्या वर्षी रिचर्डने भारताविरुद्ध टी२० सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. इतकेच नव्हे तर, त्याने पदार्पणात दणकेबाज प्रदर्शन करत कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास खरा ठरवला.
टायमल मिल्सला बाकावर बसवत कर्णधार जोस बटलरने रिचर्डला (Richard Gleeson) प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले. लियाम लिविंगस्टोनच्या हातून त्याला पदार्पणाची (Richard Gleeson International Debut) कॅप देण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचा अनुभव पाहता भारताविरुद्धही त्याच्याकडून संघाला दमदार प्रदर्शनाची अपेक्षा असावी आणि ही अपेक्षा त्याने पूर्णही केली.
From ???? to ????@liaml4893 presented @RicGleeson his England Men's IT20 cap! ????
???????????????????????????? #ENGvIND ???????? | @lancscricket pic.twitter.com/g3DCt281ul
— England Cricket (@englandcricket) July 9, 2022
रिचर्डने भारतीय संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये गणल्या जाणाऱ्या रोहित शर्मालाच (Rohit Sharma) आपली पहिली शिकार बनवले. पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत डावाची सुरुवात करणाऱ्या रोहितला रिचर्डने आपल्या पहिल्याच षटकात बाद केले. रोहित २० चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने विस्फोटक ३१ धावा करत रिचर्डच्या गोलंदाजीवर बटलरच्या हाती झेल देऊन बाद झाला.
त्यानंतर रिचर्डने विराट कोहली (०१ धाव) आणि रिषभ पंत (२६ धावा) यांना पव्हेलिनयला पाठवले. यासह एकाच टी२० सामन्यात भारताच्या रोहित, विराट आणि पंतसारख्या घातक फलंदाजांना बाद करणारा पहिला आणि एकमेव गोलंदाज बनण्याची करामतही त्याने केली. विशेष म्हणजे, या ३ विकेट्स घेताना त्याने ३ षटके फेकली आणि फक्त ८ धावा दिल्या.
☝️ Rohit Sharma
☝️ Virat Kohli
☝️ Rishabh PantSettling into international cricket nicely @RicGleeson! ????
???????????????????????????? #ENGvIND ???????? pic.twitter.com/hvBFJKeRKE
— England Cricket (@englandcricket) July 9, 2022
देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्येही चमकलाय रिचर्ड
पदार्पणात आंतरराष्ट्रीय पातळीवर इतके प्रभावी प्रदर्शन करणाऱ्या रिचर्डची देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दही उल्लेखनीय राहिली आहे. नॉर्थटम्पनशायर संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने देशांतर्गत पातळीवर ६६ टी२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ७३ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे प्रदर्शनही अतंत्य प्रभावशाली राहिले आहे. केवळ ३४ सामने खेळताना तब्बल १४३ विकेट्स त्याने काढल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘टी२० विश्वचषकानंतर बरेच खेळाडू निवृत्त होऊ शकतात’, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचे मोठे संकेत
सात महिन्यांत सात कर्णधार! नेमके असे का झाले सौरव गांगुलीनेच केला खुलासा
विराट अन् रोहितमध्ये रंगणार वरचढ ठरण्याची जंग! कोण बनणार खास ‘त्रिशतका’चा पहिला मानकरी?





