---Advertisement---

कोण आहे तो फलंदाज…ज्यानं वयाच्या 25व्या वर्षी केली डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी! दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी

On: शुक्रवार, सप्टेंबर 27, 2024 5:32 PM
---Advertisement---

श्रीलंकेचा युवा फलंदाज कामिंडू मेंडिस सध्या कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहे. पदार्पणापासूनच या डावखुरा फलंदाजानं बॅटनं कहर सुरू केला.

न्यूझीलंडविरुद्ध गॅले येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मेंडिसनं शानदार शतक झळकावून महान डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली. एक दिवस आधी त्यानं पदार्पण केल्यापासून सलग 8 कसोटी सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करून विश्वविक्रम केला होता. असा विक्रम 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात यापूर्वी घडला नव्हता. मेंडिसनं तिसऱ्या दिवशी शतकी खेळी करत अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले.

30 सप्टेंबर 1998 रोजी गॅले येथे जन्मलेल्या कामिंडू मेंडिसनं जुलै 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर कसोटी पदार्पण केलं होतं. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्यानं 61 धावा करून आपल्या आगमनाची वार्ता दिली. या सामन्यात श्रीलंकेनं दुसऱ्या डावात फलंदाजी न करता कसोटी एक डाव आणि 39 धावांनी जिंकली होती. कामिंडू मेंडिसनं तेव्हापासून मागे वळून पाहिलेलं नाही. तो सतत एकामागून एक विक्रम रचत आहे.

25 वर्षीय कामिंडू मेंडिस हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. तो दोन्ही हातानं फिरकी गोलंदाजी करू शकतो. या वर्षी जुलैमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात कामिंडूनं दोन्ही हातांनी गोलंदाजी केली होती. मेंडिसचं ही कामगिरी पाहून क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का बसला होता.

कामिंडू मेंडिसनं गॅले येथील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी 7 कसोटी सामन्यांच्या 12 डावात 822 धावा केल्या, ज्यामध्ये 4 शतकं आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. तो सध्या 74.72 च्या सरासरीनं धावा ठोकतोय. कामिंडू मेंडिसनं 9 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 190 धावा केल्या आहेत, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 57 आहे. कमिंडूच्या नावावर 50 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4558 धावा आहेत, ज्यामध्ये 200 नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 17 शतकं आणि 23 अर्धशतकं केली आहेत.

हेही वाचा – 

बांगलादेशच्या चाहत्यावर हल्ला झाला नाही, पोलिसांनी उघड केलं सत्य
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग, लवकरच खेळ संपला
SL VS NZ; कामिंदू मेंडिस ऐतिहासिक खेळी; डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाशी बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---