भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा वेळेनुसार फिट होऊ शकला नाही, ज्यामुळे तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नाहीये. अशात ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागी मध्यमगती वेगवान गोलंदाज मायकल नेसर याला ताफ्यात सामील केले आहे. नेमका नेसर आहे तरी कोण? ज्याला ऑस्ट्रेलिया संघात अचानक सामील करून घेतले गेले, ते आपण या लेखातून जाणून घेऊयात…
कोण आहे मायकल नेसर?
अष्टपैलू मायकल नेसर (Michael Neser) हा 33 वर्षीय असून तो दक्षिण आफ्रिका मूळ असलेला खेळाडू आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा सामना डिसेंबर 2022मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. अशात त्याला पुन्हा एकदा संघात सामील करण्यात आले आहे. मात्र, यावेळी सामना वेगळा आहे. नेसर याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत फक्त 2 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत.
त्याने कसोटीत 2.49च्या इकॉनॉमी रेटने आणि 16.71च्या सरासरीने गोलंदाजी करताना 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने 7.19च्या इकॉनॉमी रेटने 2 विकेट्स घेतल्या आहेत. नेसरच्या देशांतर्गत क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 96 प्रथम श्रेणी सामने खेळताना 347 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची इकॉनॉमी 2.83, तर सरासरी 23.5 इतकी होती. इतकेच नाही, तर त्याने फलंदाजी करताना 26.78च्या सरासरीने 3080 धावाही चोपल्या आहेत. यात 3 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आह.
आयपीएलमध्येही खेळलाय नेसर
मायकल नेसर याने 2013मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. तो 2013 हंगामात पंजाब किंग्स (Punjab Kings) संघात सामील झाला होता. मात्र, त्या हंगामात तो एकच सामना खेळू शकला होता. त्याने त्याचे पदार्पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध केले होते. त्या सामन्यात त्याची जोरदार धुलाईदेखील झाली होती. नेसरने त्या सामन्यात 4 षटकात 62 धावा खर्च केल्या होत्या.
तोच त्याचा पहिला आणि अखेरचा आयपीएल हंगाम ठरला. यानंतर त्याला पुन्हा कधीच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच, नेसर ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठित बिग बॅश लीग स्पर्धेचाही भाग राहिला आहे. मात्र, त्याचे भारताविरुद्धच्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात खेळणे कठीण वाटत आहे. कारण, तिसऱ्या गोलंदाजाच्या रूपात ऑस्ट्रेलिया संघ स्कॉट बोलँड याला प्राथमिकता देऊ शकतो. (who is michael neser which replaced josh hazlewood australia ind vs aus wtc final 2023 know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Cricket Ball: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये वापरला जाणार Duke Ball, ‘या’ 3 चेंडूंनी आख्खं जग खेळतं क्रिकेट
Love-Jihad Controversy: गुजरात संघाच्या खेळाडूचं इंस्टाग्राम हॅक? माफी मागितल्यानंतर केला नवीन खुलासा