---Advertisement---

21व्या वर्षी 150च्या वेगाने गोलंदाजी.. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजापासून भारतीय फलंदाजाना राहावं लागेल सावध!

On: बुधवार, सप्टेंबर 11, 2024 6:21 PM
Nahid Rana
---Advertisement---

बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानविरुद्धची ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नाहिदची वेगवान गोलंदाजी पाहून अनेक जण अवाक झालेत. सातत्याने 150 किमीटर प्रतितास वेगाने चेंडू फेकण्यात नाहिद माहीर आहे. आता त्याची नजर भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेवर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची आपण आतुरतेने वाट पाहत असल्याचे नाहिदचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या 6 फूट 3 इंच उंच गोलंदाजाने भारतीय संघाचेही टेन्शन वाढवले ​​आहे.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेल्या नाहिद राणाने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 4 बळी घेत, बांगलादेशच्या ऐतिहासिक मालिका विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या डावात त्याने एक विकेट घेतली होती. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेश संघ सज्ज आहे. बांगलादेशच्या खेळाडूंनी यासाठी सरावही सुरू केला आहे.

राणाने या वर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने ताशी 150 किमी पेक्षा जास्त वेग गाठून लोकांचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानविरुद्धही त्याने प्रभावी कामगिरी केली. राणा चेन्नईतील भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो, जिथे खेळपट्टीवर चांगली उसळी असेल.

राणाला 152 किमी वेगाने गोलंदाजी करण्यास तयार आहेस का? असे विचारल्यानंतर तो म्हणाला, ‘मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यास कटिबद्ध आहे. आपण नेहमी वेगाचा अंदाज लावू शकत नाही. ते लयीवर अवलंबून असते. मी कोणताही आव्हान स्वतःसाठी ठेवलेले नाही. मी फक्त संघाची रणनीती अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. मला इतरांसारखं व्हायचं नाही. माझी ओळख बांगलादेशचा नाहिद राणा म्हणून प्रस्थापित करायची आहे. मी कोणत्याही विशिष्ट गोलंदाजाला फॉलो करत नाही. मी प्रत्येकाकडून काहीतरी शिकलो आहे.”
राणा याच्यावर सर्वांची नजर असली तरी, बांगलादेशची ताकद त्यांची फिरकी गोलंदाजी असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्ही पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवू शकतो”, अमेरिकेच्या गोलंदाजाने व्यक्त केला विश्वास
IND vs BAN: कडेकोट बंदोबस्तात खेळवली जाणार कानपूर कसोटी, खेळाडूंसाठीही विशेष सुरक्षा व्यवस्था
बांग्लादेश टी20 मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या ॲक्शनमध्ये; Photos

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---