---Advertisement---

संदीप शर्माची नवी नवरी नताशा सात्विक आहे ज्वेलरी डिझाईनर, जाणून तिच्याबद्दल सर्वकाही

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 3:49 PM
---Advertisement---

आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची बऱ्याच काळापासूनची प्रेयसी नताशा सात्विक हिच्याशी विवाह केला आहे. विवाहाआधी नताशा कोण आहे हे कोणालाच माहित नव्हते. त्यामुळे संदीपच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, त्याची पत्नी कोण आहे? आणि ती काय काम करते?

संदीप शर्माची पत्नी नताशा व्यवसायाने ज्वेलरी डिजाईनर आहे. त्याचसोबत ती ब्लाॅगर आणि डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट आहे. तिने तिचे शिक्षण बिशप काॅटन्स स्कूलमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढे २०१४ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलाॅजीमधून ज्वेलरी डिजाइनिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.

नताशाने २०१३ साली दावणम ज्वेलर्समध्ये इंटर्नशिप करून तिच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने २०१४ मध्ये तनिष्क ज्वेलर्समध्ये ६ महिन्यांची इंटर्नशिप केली होती. ती सध्या स्किल ९ युनिव्हर्सल एकॅडमीमध्ये डायरेक्टर ऑफ क्रिएटिव हेड या पदावर काम करते.

नताशा ही मुळची बेंगलोरची रहिवासी आहे आणि संदीप शर्मा हा पंजाबच्या पटियालाचा आहे. या दोघांमध्ये मागच्या बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर या दोघांनी २० ऑगस्ट २०२१ रोजी विवाह केला.

संदीप शर्मा एक चांगला गोलंदाज आहे. त्याने भारतीय संघासाठी २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण केले होते. त्याने झिंबाब्वे विरुद्ध २ टी-२० सामन्यात १ विकेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा त्याला आजपर्यंत भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. संदीप ४४ प्रथम श्रेणी आणि ४९ लिस्ट-ए सामने खेळला आहे. त्यात त्याने २०० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. संदीप सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. अशी आशा व्यक्त केली जात आहे, की लग्नानंतर त्याचे दिवस बदलतील आणि नताशा त्याच्यासाठी लेडी लक घेऊन येईल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘लॉर्ड्स’ जिंकले आता ‘लीड्स’वर चढाई, भारतीय संघ हेडिंग्लेला रवाना; प्रवासादरम्यान केली भरपूर मस्ती

हेडिंग्ले कसोटीत जडेजाचे बाहेर होणे निश्चित, ‘ही’ कारणे अश्विनला संधी देण्यास भाग पाडणार!

जबरा सेलिब्रेशनचे जबरा चाहते! मोहम्मद सिराजच्या विशेष जल्लोषाचे हैदराबादमध्ये भलेमोठे कट-आऊट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---