युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याचे नशीब अवघ्या एका आठवड्यात असं बदललं की, संपूर्ण देशभरात त्याची चर्चा सुरू आहे. आधी आयपीएलमधील लखनऊ फ्रँचायजीने त्याला ४ कोटी रुपये देऊन संघात स्थान दिले, तर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याची निवड झाल्यानंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच ११ वर्षीय पूजा बिश्नोईने (Pooja Bishnoi) देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान फोटो शेअर केल्यानंतर तिचा फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. कोण आहे पूजा बिश्नोई ? चला जाणून घेऊया. (Who is Pooja Bishnoi)
काही मोजकेच लोक आहेत ज्यांना पूजा बिश्नोई कोण आहे हे माहीत असेल. तर अनेकांना याबाबत कल्पनाही नसेल. १० एप्रिल २०११ रोजी जन्मलेल्या पूजाला माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) फ्लॅट गिफ्ट केला होता, तर एमएस धोनीने (Ms dhoni) मुंबईत भेट घेण्यासाठी बोलवले होते. ज्या वयात मुलं नीट चालायलाही शिकू शकत नाहीत, त्याच वयात पूजाने ॲथलीट व्हायचं ठरवलं आणि वयाच्या तिसऱ्या वर्षीच तिने त्यासाठी तयारी देखील सुरू केली होती.
पूजा बिश्नोईबद्दल बोलायचं झालं, तर ती वयाच्या पाचव्या वर्षी सिक्स पॅक ॲब्समुळे चर्चेत आली होती. वयाच्या ६ व्या वर्षी तिने ४८ मिनिटात १० किमी अंतर पूर्ण केले होते, तर वयाच्या ८ व्या वर्षी तिने १२.५० मिनिटात ३ किमी अंतर धावून पूर्ण केले होते. एक उत्तम धावपटूसह ती एक वेगवान गोलंदाज देखील आहे. तिचे खेळावरील असलेले प्रेम पाहून विराट कोहली फाऊंडेशन तिचा खर्च उचलत आहे. तसेच विराट कोहलीने तिला जयपूरमध्ये एक फ्लॅट देखील गिफ्ट केला होता. तसेच एमएस धोनीने तिला मुंबईला देखील बोलावले होते. ते एका शूटिंगसाठी एकत्र आले होते.
पूजा रवी बिश्नोईची बहीण आहे का?
पूजाने रवी बिश्नोईसोबत एक सेल्फी फोटो शेअर केला होता. तेव्हापासून ती रवी बिश्नोईची बहीण असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, हे खोटं आहे. पूजा ही रवी बिश्नोईची बहीण नाही. रवी बिश्नोईला दोन बहिणी आहेत. एका बहिणीच नाव अनिता तर दुसऱ्या बहिणीच नाव रिंकू आहे.
महत्वाच्या बातम्या :
मेगा लिलावात ‘या’ ५ गोलंदाजांचा गच्च भरणार खिसा; पर्पल पटेलचं मात्र नाव नाही
ठरलं तर! आयपीएल २०२२ साठी तब्बल ५९० खेळाडूंचा होणार लिलाव; ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचा समावेश
“इतकी उत्सुकता वाढवायची काय गरज” लखनऊ संघाच्या लोगोचे अनावरण होताच चाहत्यांनी केले ट्रोल