भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिनं तिच्या आवडत्या फलंदाजाचं नाव उघड केलं आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत मंधानानं तिच्या आवडत्या फलंदाजाबाबत खुलासा केला. तुझा आवडता फलंदाज कोण? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर स्मृतीनं प्रतिक्रिया दिली. मंधानानं रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर किंवा महेंद्रसिंह धोनीचं नावं घेतलं नाही. तिनं विराट कोहली आपला आवडता फलंदाज असल्याचं म्हटलं आहे.
स्मृती मंधाना विराट कोहलीबाबत बोलताना म्हणाली की, “मी कोहलीचा आदर करते. जेव्हा मी कोहलीला भेटले तेव्हा मी त्याला त्याच्या मानसिकतेबद्दल विचारलं. जेव्हा तो फलंदाजीला जातो, तेव्हा तो काय विचार करतो? असा प्रश्न मी त्याला विचारला. तू अपेक्षांचं ओझं कसं सांभाळतो? असं मी विचारलं. यावर कोहलीनं मला सांगितलं की, मी काहीही विचार करत नाही. मी फक्त तेच करतो, जे संघासाठी गरजेचं असतं. मी याबद्दल जास्त विचार करत नाही.”
विराट कोहली आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहली संघाचा भाग नव्हता. त्यावेळी तो वडील होणार होता, म्हणून त्यानं मालिकेतून नाव मागे घेतलं होतं. आता आता बऱ्याच काळानंतर विराट कोहली कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. यानंतर वर्षाच्या शेवटी टीम इंडियाला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
हेही वाचा –
एमएस धोनीचा वीस वर्षे जुना विक्रम थोडक्यात हुकला; या खेळाडूने केली बरोबरी
जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला? संघातील हे महत्त्वाचं पद गेलं, बीसीसीआयच्या निर्णयामुळे खळबळ
ऋतुराज-अय्यरला वगळलं, पण या तिघांना संधी कशी मिळाली? संघ निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित