---Advertisement---

संघात सर्वात खोटारडा कोण? दिग्गज खेळाडूनं केला खुलासा

On: बुधवार, ऑगस्ट 28, 2024 3:35 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यामध्ये पहिल्याच कसोटी सामन्यात बागंलादेशनं रावलपिंडीच्या मैदानावर पाकिस्तानला धूळ चारली. घरच्या मैदानावर त्यांना 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सध्या पाकिस्तान संघातील सर्व स्टार खेळाडू सातत्यानं खराब कामगिरी करताना दिसत आहेत. तत्पूवी पाकिस्तान संघातील सर्वात मोठा खोटारडा कोण होता? संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनं (Wasim Akram) याबाबत खुलासा केला आहे.

अनेक वर्षांपूर्वी वसीम अक्रम (Wasim Akram) कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शो-मध्ये दिसला होता, जिथं त्यानं संघातील सर्वात खोटे बोलणाऱ्या खेळाडूबद्दल खुलासा केला होता. शो-मध्ये वसीम अक्रमला विचारण्यात आलं की पाकिस्तान संघात कोणाला सांभाळणे सर्वात कठीण आहे? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “‘शोएब अख्तर’, तो मोठा खोटारडा होता.”

पुढे बोलताना त्यानं सांगितलं की, “कोलकाता येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान आम्ही ताज बंगालमध्ये थांबलो होतो आणि खाली एक नाईट क्लब होता. मी शोएबला नाईट क्लबमध्ये जाऊ नकोस असे सांगितले.” यावर उत्तर देताना अख्तर म्हणाला, “वसीम भाई काय बोलताहेत, मी कसोटी सामना खेळतोय, वेडा आहे.” त्यानंतर अक्रम म्हणाला की, “तो रात्री 12 वाजता नाईट क्लबमध्ये गेला तेव्हा त्यानं शोएबला शर्ट काढून स्टेजवर डान्स करताना पाहिलं.”

महत्त्वाच्या बातम्या-

“40 टक्के सामने खेळले नाहीत आणि आराम…” रोहित-विराटबद्दल माजी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य
ब्रेकिंग बातमी! आयपीएल 2025 साठी झहीर खानला मिळाली मोठी जबाबदारी, या संघाच्या मेंटॉरपदी वर्णी
आयसीसी क्रमवारीत प्रचंड चढ-उतार! बाबर आझमची घसरण, विराटला मोठा फायदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---