ट्रिस्टन स्टब्स हे नाव इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला पहिलाच डाव खेळताना त्याने मोठा धमाका केला आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने केवळ २८ चेंडूत ८ षटकारांसह ७२ धावा केल्या. त्यानंतर सर्व ठिकाणी त्याच्या नावाची चर्चा होतेय. मात्र हा स्टब्स आहे कोण? हे देखील आपल्याला जाणून घ्यायला हवं.
दक्षिण आफ्रिकेच नव वादळ ट्रिस्टन स्टब्स
ब्रिस्टल येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात २३५ धावांचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेसाठी युवा ट्रिस्टन स्टब्सने सर्वांचे मन जिंकणारी कामगिरी केली. अनुभवी फलंदाजांनी कच खाल्ल्यानंतर तो इंग्लंडच्या कसलेल्या गोलंदाजांवर तुटून पडला. अवघ्या २१ व्या वर्षी त्याने मारलेले षटकार पाहून अनेकांना एबी डिव्हिलियर्सची आठवण झाली.
https://twitter.com/ARRRjun88/status/1552511192505417728?t=LBRMSI1A_Js3RSqWDipYBw&s=19
ट्रिस्टनला यावर्षी आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चरचा बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. इथे त्याला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने भारतातच टी२० पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, दिल्ली व बेंगलोर येथील सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
त्याच्या टी२० क्रिकेटमधील आजवरच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास लक्षात येईल की, तो कोणत्या ताकदीचा खेळाडू आहे. त्याने आजवर टी२० क्रिकेटमध्ये ५८० धावा केल्या असून त्यातील २४० धावा षटकारांनी आल्या आहेत. तसेच १०८ धावा चौकारातून त्याने वसूल केल्या आहेत. त्याची ही खेळी पाहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने ट्विट करत म्हटले,
“स्टब्स व ब्रेविस पुढील दहा वर्ष कहर करणार आहेत”
आता कुठे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेला स्टब्स पुढे आयपीएल व इतर व्यावसायिक टी२० लीग मध्ये तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणार हे निश्चित मानले जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022: बर्मिंघममधून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी चिंतेची बातमी; पदकाची दावेदार कोरोनाबाधित?