---Advertisement---

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? कोणते संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील, जाणून घ्या संपूर्ण समीकरण!

On: मंगळवार, एप्रिल 22, 2025 3:34 PM
---Advertisement---

आयपीएल स्पर्धेचा 18 वा हंगाम सध्या सुरू आहे. आतापर्यंत 39 सामने खेळले गेले आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स सोडून सर्व संघाने 8-8 सामने खेळले आहेत. टॉप 4 मध्ये असे तीन संघ आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकही आयपीएल किताब जिंकलेला नाही. तसेच 5-5 किताब जिंकलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ पिछाडीवर आहेत. आता प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण आहे. जाणून घ्या सर्व संघ पॉईंट्स टेबल मध्ये कोणत्या स्थानावर आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना काय करावे लागेल.

आयपीएलचा 39 वा सामना गुजरात टायटन्सने 39 धावांनी जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा केला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये कोणता बदल झाला नाही, पण त्यांचे 12 गुण झाले आहेत. आता गुजरातचे 5 सामने खेळायचे बाकी आहेत, ज्यामध्ये त्यांनी 3 सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही अन्य संघाच्या निर्णयावर निर्भर रहावे लागणार नाही.

टॉप चार संघांमध्ये फक्त गुजरात असा संघ आहे, ज्याने आयपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे. यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स आहेत यांनी एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. दिल्लीने 7 मधील 5 सामने जिंकले आहेत. आरसीबी आणि पंजाबने 8- 8
सामने खेळले आहेत, त्यामध्ये दोन्ही संघांनी 5- 5 सामन्यात विजय मिळवला आहे. जर या संघाने अजून 4 सामने जिंकले, तर ते प्लेऑफमध्ये सहज पोहोचू शकतात. जरी त्यांनी 3 सामने जिंकले तरी ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, पण तेव्हा जास्त टक्कर द्यावी लागेल.

लखनऊने 8 सामन्यांमध्ये 5 सामने जिंकून 5 व्या स्थानावर आहे. त्यांना सुद्धा 5 सामने जिंकावे लागतील आणि नेट रन रेटमध्ये सुधार करावा लागेल. तसेच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे सामने पराभूत होऊन, आता चांगली सुरुवात केली आहे. मुंबईने 8 सामन्यांमधील 4 सामने जिंकले आहेत आणि येणाऱ्या 6 सामन्यांमधील त्यांना कमीत कमी 5 सामने जिंकावे लागतील.

चेन्नई सुपर किंग्सने 8 सामन्यांमधील फक्त 2 सामने जिंकले आहेत आणि आता ते प्लेऑफ मधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहेत. येणारे 6 सामने त्यांना जिंकणे गरजेचे आहे, तरच ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील. सध्या संघ दहाव्या नंबरवर आहे. राजस्थान रॉयल संघाची सुद्धा हीच अवस्था आहे, संघाने 8 सामन्यांमधील फक्त 2 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादने सुद्धा 7 सामन्यांमधील फक्त दोन सामने जिंकले आहेत. ते पॉईंट्स टेबलवर नवव्या स्थानावर आहेत. केकेआरने 8 सामन्यांमधील 3 सामने जिंकले आहेत. ते पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहेत.

सध्या ऑरेंज कॅप साई सुदर्शनकडे आहे. गुजरात टायटन्सच्या या फलंदाजाने खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 52.12 च्या एव्हरेजने 417 धावा केल्या आहेत. दुसऱ्या नंबरवर लखनऊ संघाचा निकोलस पुरण आहे, त्याने 368 धावा केले आहेत.

पर्पल कॅप सुद्धा गुजरात टायटन्सच्या गोलंदाजाकडे आहे. त्याने 8 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच दुसऱ्या स्थानावर कुलदीप यादव आहे, त्याने आतापर्यंत 12 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---