---Advertisement---

‘तुमचा डेथ ओव्हर्समधील गोलंदाज कोण?’; भारतीय दिग्गजाचा टीम इंडियाला सवाल

On: सोमवार, डिसेंबर 5, 2022 10:05 PM
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 4 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेेला. या सामन्यात बांगलादेश संघाने अक्षरशः भारतीय संघाच्या जबड्यातून विजय हिसकावला. अखेरच्या जोडीने नाबाद 54 धावांची भागीदारी करत बांगलादेशला एक गडी राखून विजय मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांना बांगलादेशचा शेवटचा गडी बाद करता आला नाही. त्यानंतर भारतीय संघावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने टीका केली आहे.

भारतीय संघाने 187 धावांचा बचाव करताना बांगलादेशचे नऊ गडी 136 धावांवर बाद केलेले. मात्र, मेहदी हसन मिराज व मुस्तफिजूर रहमान यांनी नाबाद भागीदारी करत बांगलादेशला संस्मरणीय विजय मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर बोलताना कैफ म्हणाला,

“भारतीय संघाने हा सामना जिंकायला हवा होता. 9 गडी बाद करेपर्यंत आपली गोलंदाजी उत्कृष्ट होती. मात्र, आपण शेवटचा एक बळी मिळवू शकलो नाही. आपला डेथ ओव्हर्सचा गोलंदाज कोण? कुलदीप सेन की दीपक चहर?”

कैफ याने या सामन्यातील भारताच्या क्षेत्ररक्षणावर देखील टीकास्त्र डागले.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र, बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याने पाच बळी मिळवत भारतीय संघाची वाताहात केली. केएल राहुल याने भारतासाठी सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याच्या या योगदानामुळे भारतीय संघ 186 पर्यंत मजल मारू शकला होता. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघ भारतीय गोलंदाजां पुढे टिकू शकला नाही. त्यांचे 9 गडी 136 धावांवरच परतले होते. मात्र, अखेरच्या जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी करत बांगलादेशला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

मालिकेतील दुसरा सामना 7 डिसेंबर रोजी मिरपूर येथे खेळला जाईल. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

(Who Is Your Death Over Specialist Mohmmmad Kaif Asks)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा| डेक्कन जिमखानाचे युनायटेड स्पोर्ट्स क्लबपुढे मोठे आव्हान
दिवंगत वॉर्नला मिळाला मानाचा पुरस्कार! क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---