---Advertisement---

मुस्तफिझुरला आयपीएल मधून बाहेर कुणी काढले? बीसीसीआयच्या निर्णयावरती झाला मोठा खुलासा!

On: मंगळवार, जानेवारी 6, 2026 1:09 PM
---Advertisement---

केकेआरने आयपीएल 2026 च्या लिलावात बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला 9.20 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. मात्र, बांगलादेश आणि भारत यांच्यातील वाढता तणाव पाहता, बीसीसीआयने केकेआरला रहमानला आपल्या संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून हे प्रकरण वादात असून बांगलादेश संघाने भारतात येऊन टी20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयच्या टीममधील नक्की कोणा मुळे रहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्याचा हा निर्णय घेण्यात आला, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, बोर्डाच्या सर्वात प्रमुख आणि महत्त्वाच्या सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये इतर अधिकाऱ्यांना काहीही सांगण्यात आले नाही आणि इतरांना ही बाब मीडियाद्वारे समजली. हा एक धक्कादायक खुलासा आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्हाला स्वतःला मुस्तफिजुर रहमानबद्दल मीडियातून कळाले. कोणतीही चर्चा झाली नाही किंवा आमचे मतही घेतले गेले नाही.” अहवालात असेही नमूद केले आहे की, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी बोर्डाची किंवा आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झाली होती की नाही, याचा खुलासा केलेला नाही.
मुस्तफिजुर रहमानला आयपीएल 2026 मधून बाहेर काढल्याची बाब बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आवडलेली नाही. याच कारणामुळे त्यांनी बांगलादेशचा संघ टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यांचे असे मानणे आहे की, जर मुस्तफिजुर रहमानच्या सुरक्षेची समस्या असेल, तर संपूर्ण बांगलादेश संघाला सुरक्षित ठेवणे भारतासाठी कठीण जाईल. याच कारणामुळे त्यांना आपले सामने श्रीलंकेत हलवायचे आहेत.

बांगलादेश सरकारने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, मुस्तफिजुर रहमानला IPL मधून बाहेर काढण्याचे कारण त्यांना समजलेले नाही. त्यानंतर त्यांनी जाहीर केले की, इंडियन प्रीमियर लीगचे सामने बांगलादेशात पुढील आदेशापर्यंत प्रसारित केले जाणार नाहीत. बांगलादेश सरकारने आयपीएलच्या विरोधात हा निर्णय घेऊन सर्वांना चकित केले आहे. अर्थात, यामुळे बीसीसीआयला आर्थिकदृष्ट्या फारसे नुकसान सोसावे लागणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---