---Advertisement---

ऐकलंत का! मिस्टर अँड मिसेस कोहलीला ‘या’ अभिनेत्रीच्या पतीने दिला होता इटलीत लग्न करण्याचा सल्ला

On: शनिवार, मे 1, 2021 7:30 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सोहळा ११ डिसेंबर २०१७ रोजी पार पडला होता. त्यांचा विवाहसोहळा इटलीत कुटुंब आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थित साजरा करण्यात आला होता.

विराट अनुष्काचा हा लग्न संभारंभ फक्त  जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थित झाला असल्याने त्यांना पत्रकार किंवा पापाराझी वगैरे लोकांचा त्रास झाला नाही. त्यामुळे हा संभारंभ शांततेत पार पडला होता.

विराट अनुष्काने इटलीत लग्न तर केले पण त्यांना इटलीत लग्न करण्याचा सल्ला अनुष्काचा मार्गदर्शक आदित्य चोप्राने दिला होता. खुद्द आदित्य आणि राणी मुखर्जीने तीन वर्षांपूर्वी इटलीतच लग्न केले होते.

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे “विराट अनुष्काने इटलीत लग्न करावे ही आदित्य चोप्राची कल्पना होती. इथे लग्न केले तर पापाराझी वगैरे लोकांमुळे तमाशा होईल असा सल्ला त्यांनी दिला होता. “

सूत्रांच्या म्हणण्यानुसार चित्रपटसृष्टीतील फक्त आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीला लग्नासाठी आमंत्रण होते, पण ते त्यांच्या मुलीमुळे जाऊ शकले नव्हते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment