---Advertisement---

हा माजी भारतीय क्रिकेटर म्हणतोय,”सात-सात तास वनडे क्रिकेट कोण पाहणार?”

On: बुधवार, जुलै 27, 2022 7:39 PM
team-India
---Advertisement---

आजकाल क्रिकेटमध्ये ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे वनडे क्रिकेट. वनडे क्रिकेटची लोकप्रियता, उपयुक्तता आणि भविष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानचे महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी तर क्रिकेटचा हा प्रकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. या दरम्यान काही माजी क्रिकेटपटू असे आहेत त्यांना हा प्रकार हवा आहे. त्यांनी फक्त या प्रकारात काही बदल करणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आता भारताचे माजी अष्टपैलू अजय जडेजा यांच्या नावाची भर पडली आहे.

एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना जडेजा म्हणाले,

“जेव्हा वनडे क्रिकेट आले होते तेव्हा सर्वजण त्याच्याकडे आकर्षित झाले. प्रायोजक आणि प्रसारक यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावतात. त्यावेळी वनडे क्रिकेट महागडे वाटायचे. आता त्याची जागा टी२० ने घेतली आहे. ब्रॉडकास्टर्स टी२० सामने दाखवण्याचे अधिक पैसे देतात. साडेतीन तासाचा टी२० सामना असताना सात-आठ तासाच्या वनडेसाठी कोण वेळ आणि पैसा खर्ची घालेल.”

याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले,

“वनडे क्रिकेटचा कालावधी कमी करण्यास काय अडचण आहे? सुरुवातीला वनडे ६० षटकांची होती. पुढे ती ५० षटकांची झाली‌‌. आता वनडे सामने ४० षटकांचे झाले तर आणखी मनोरंजक होतील.”

जडेजा यांच्याप्रमाणेच माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री व पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी देखील वनडे क्रिकेट ४० षटकांचे करण्यात यावे अशी संकल्पना मांडलेली.

ही सर्व चर्चा इंग्लंडचा कसोटी कर्णधार व २०१९ विश्वचषकाचा नायक ठरलेल्या बेन‌ स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुरू झाली होती. त्याने अतिक्रिकेटचे कारण सांगत ३१ व्या वर्षीच वनडे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलेला. इतरही काही खेळाडूंनी सध्या जास्त प्रमाणात क्रिकेट होत असल्याचे कबूल केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘एका वनडेचा त्याला काय फायदा?’, भारताच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

बेअरस्टोचा WWE सुपरस्टार अवतार! मात्र, पुढे घडली दुर्दैवी घटना; पाहा व्हिडिओ

आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---