Next Captain of Indian Test Team: भारतीय संघ 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला 10 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. यातील कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. अशात भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने मोठे विधान केले आहे. त्याने सांगितेल की, रोहित शर्माने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, तर त्याच्या जागी पुढील कसोटी कर्णधार कोण बनू शकतो?
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्यानुसार, शुबमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) कसोटी कर्णधार बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. गिल दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग आहे. तसेच, रिषभ पंत मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या गंभीर दुखापतीतून सावरत आहे. तसेच, त्याच्या पुनरागमनाची वेळ अद्याप निश्चित झाली नाहीये.
काय म्हणाला चोप्रा?
चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यानंतर पुढील भारतीय संघाचा पुढील कसोटी कर्णधार (Next Captain of Indian Test Team) कोण असू शकतो. तो म्हणाला, “मी दीर्घ काळाविषयी बोलत आहे. हा शुबमन गिल असू शकतो. मी सध्याच्या काळाविषयी बोलत नाहीये. मी फक्त भविष्याविषयी बोलत आहे. रिषभ पंत आणखी एक मजबूत दावेदार आहे. रिषभ पंत कसोटी क्रिकेटपटू म्हणून 24 कॅरेट सोनं आहे. पंत गेम चेंजर आहे. एकदा जर रोहित शर्माने कसोटीचे नेतृत्व सोडले, तर तुम्ही या दोन पर्यायांवर नजर टाकू शकता.”
कर्णधारपदाचा अनुभव
शुबमन गिल हा सध्या 24 वर्षांचा असून त्याने अद्याप कोणत्याही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले नाहीये. मात्र, शुबमनला गुजरात टायटन्स संघाने आगामी आयपीएल 2024 हंगामासाठी कर्णधार बनवले आहे. तसेच, रिषभ पंत याने 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये पंतलाही कसोटी नेतृत्वाचा अनुभव नाहीये.
मालिका जिंकणे नसेल सोपे
आकाश चोप्रा याने पुढे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील आगामी कसोटी मालिकेवरही आपले मत मांडले. भारताने दक्षिण आफ्रिकेत कधीच कसोटी मालिका जिंकली नाहीये. आगामी मालिकेत भारत इतिहास रचेल का? यावर चोप्रा म्हणाला की, हे सोपे नसेल.
तो म्हणाला, “भारत जिंकू शकतो, पण हे बिल्कुल सोपे नसेल. कारण, ही फक्त 2 सामन्यांची कसोटी मालिका आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णित राहण्याची शक्यता खूप कमी आहे. आपल्याला स्थिती समजून घेण्यात वेळ लागेल. जरी आपण तिथे पोहोचल्यानंतर पूर्णपणे तयार असलो, तरीही दक्षिण आफ्रिकेचा सामना करणे सोपे नसेल.”
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबरदरम्यान सेंच्युरियन येथे पार पडेल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना केप टाऊनमध्ये खेळला जाईल. या मालिकेत बरेच नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. (who will be test captain after rohit sharma aakash chopra named these 2 players know here)
हेही वाचा-
मिचौंग चक्रिवादळादरम्यान लोकल बॉय अश्विनचा चेन्नई शहराला खास मेसेज, मराठमोठा रहाणे म्हणाला…
मिस्ट्री स्पिनर जोमात, फलंदाज कोमात! वरुण चक्रवर्तीने 9 धावा खर्चत घेतल्या 5 विकेट्स, नागालँड फक्त…