---Advertisement---

भारतीय संघाचा पुढचा ODI कर्णधार कोण असावा? जाणून घ्या आफ्रिकेचा माजी दिग्गज काय म्हणाला?

On: रविवार, सप्टेंबर 7, 2025 4:55 PM
---Advertisement---

साऊथ आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू डॅरिल कुलिनन (Daryl Cullinan) यांनी भारताचा पुढचा वनडे कर्णधार कोण असावा याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. कुलिनन यांच्या मते, रोहित शर्मा (Rohit Sharma) नंतर शुबमन गिल (Shubman gill) हा वनडे कर्णधारपदासाठी सर्वात योग्य पर्याय आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना त्यांनी सांगितलं, होय, गिल कर्णधारपदासाठी तयार आहे, मग रोहित खेळो अथवा न खेळो. रोहित शर्मा 2027 चा वर्ल्ड कप खेळेल का? या प्रश्नावरही डॅरिल कुलिनन यांनी आपलं मत स्पष्ट केलं. ते म्हणाले, माझ्या मते क्षमता आणि अनुभव या दृष्टीने पाहिलं, तर रोहित नक्की खेळू शकतो, याबाबत शंका नाही. पण त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने खेळावं लागेल.

ते पुढे म्हणाले, मी असं म्हणत नाही की तो कायम मैदानावरच असावा, पण त्याने बरच क्रिकेट खेळलं पाहिजे. विशेषत: वर्ल्ड कपच्या आधी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे फिट राहणं महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मेहनत करावी लागते, फिट राहावं लागतं. त्यामुळे पुढची दोन वर्षं त्याने दर्जेदार क्रिकेट खेळलं पाहिजे. कमी क्रिकेट खेळून तुम्ही संघात जागा मिळवू शकत नाही.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र आता दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दिसतील. ऑक्टोबर महिन्यात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---