भारतीय क्रिकेट संघ नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाच्या शर्यतीत गोतम गंभीरचं नाव चर्चेत आहे. परंतु बीसीसीआयनं अजून कोणाचं नाव स्पष्ट केलं नाही. काही दिवसांपूर्वी रिकी पाॅन्टिंग, आणि जस्टिन लँगर यांची नाव भारतीय प्रशिक्षकासाठी चर्चेत होती. परंतु बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं की, आम्ही कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला प्रशिक्षकासाठी संवाद साधला नाही.
जय शाहाच म्हणणं आहे की, आम्ही असा प्रशिक्षक शोधतोय ज्याला भारतीय क्रिकेटची खोल माहिती असली पाहिजे. आणि त्याला देशांतर्गत क्रिकेटविषयी माहिती असावी. आता इथे प्रश्न पडतो की राहुल द्रविड नाही तर गौतम गंभीरमध्ये काय कमी आहे? यांच्यापेक्ष्या भारतीय क्रिकेटची जास्त रचना कोण समजू शकेल?
बीसीसीआय (BBCI) सचिव जय शाहच्या वक्तव्यानं एक गोष्ट स्पष्ट झाली की, भारतीय क्रिकेट बोर्ड कोणत्याही माजी भारतीय खेळाडूला संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्याच्या विचारात आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ आगामी टी20 विश्वचषक 2024 नंतर समाप्त होणार आहे. ते भारतीय संघाशी त्यांचा करार वाढवू इच्छित नाहीत.
गौतम गंभीर सध्या केकेआरचा मेंटाॅर आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली, केकेआर संघ आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये पोहोचला. याआधी गंभीरनं दोन वेळा केकेआरला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवलं आहे. हे खरं आहे की त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोचिंगचा अनुभव नाही. पण त्याला भारतीय क्रिकेट समजतं. गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनवल्यास त्याचा भारतीय संघाला फायदा होणार की नाही? हेदेखीलपाहणं आवश्यक आहे.
गंभीरला 147 एकदिवसीय, 58 कसोटी आणि 37 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यानं 500 हून अधिक देशांतर्गत सामने खेळले आहेत. राज्यातून येणाऱ्या युवा खेळाडूंना तो चांगल्या प्रकारे ओळखतो.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे का? पावसानं खोळंबा घातला तर कोणता संघ बनेल चॅम्पियन?
नताशा स्टॅनकोविच पूर्वी हार्दिक पांड्यानं ‘या’ सेलिब्रिटींना डेट केलं होतं, जाणून घ्या
काय सांगता! टी20 विश्वचषकात खेळणारा एकही भारतीय खेळाडू आयपीएलच्या फायनलमध्ये नाही!