---Advertisement---

गुजराज टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणाला मिळणार संधी?

On: मंगळवार, मार्च 25, 2025 2:42 PM
---Advertisement---

गुजरात टायटन्स संघाचा आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे. हा सामना मंगळवारी म्हणजेच 25 मार्च रोजी अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात संघासाठी पहिल्यांदा जॉस बटलर ओपनिंग करताना दिसू शकतो. तसेच दुसरीकडे पंजाब संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंग ओपनिंग करताना दिसू शकतो हा सामना आव्हानात्मक दिसू शकतो.

जर हेड टू हेड रेकॉर्ड पाहिलं, तर गुजरात टायटन्स संघाचं पारडं जड दिसून येत आणि दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळण्यात आले आहेत यादरम्यान गुजरातने 3 तर पंजाबने 2 सामने जिंकलेले आहेत. गुजरात आणि पंजाबमध्ये पहिला सामना 2022 मध्ये खेळला गेला होता. हा सामना गुजरातने 6 विकेट्सने जिंकला होता, तसेच याच हंगामातील पुढचा सामना पंजाबने 8 विकेट्सने जिंकला होता.

गुजरातच्या प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये बटलर, गिल आणि ग्लेन फिलिप्स यांची जागा पक्की आहे. राहुल तेवतिया आणि राशिद खान हे देखील मैदानात उतरतील. पंजाब प्लेइंग इलेव्हन बघितल्यास ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस यांचे स्थान पक्के आहे. तसेच हरप्रीत बरार लोकी फर्ग्युसन आणि युजवेंद्र चहल सुद्धा मैदानावर उतरू शकतात, याचबरोबर अर्शदीप सिंग सुद्धा मैदानावर उतरेल. त्याचे आत्तापर्यंत रेकॉर्ड खूप चांगलं राहिलेल आहे.

गुजरात टायटन्स: शुबमन गिल (कर्णधार), जॉस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, ग्लेन फिलिप्स, वाशिंगटन सुंदर, राहुल तेवतिया, राशिद खान, कगीसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंह , प्रियांश आर्य, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मैक्सवेल, शशांक सिंह, नेहल वढेरा/सूर्यांश शेगड़े, मार्को जानसेन, हरप्रीत बरार, लॉकी फर्ग्यूसन, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---