---Advertisement---

फर्ग्युसनच्या जागी कोण खेळणार? जाणून घ्या पंजाब व कोलकाता संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

On: मंगळवार, एप्रिल 15, 2025 3:47 PM
---Advertisement---

आज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स त्यांच्या घरेलू मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना यामुळे देखील खूप खास आहे कारण मागच्या वर्षी त्याच्या नेतृत्वामध्ये त्याने संघाला चॅम्पियन बनवले होते. आज तो त्यांच्याविरुद्ध खेळताना दिसणार आहे. (15एप्रिल) रोजी मुलांपूर स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळला जाणार आहे. जाणून घ्या दोन्ही संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हन सोबत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्स संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावाच लागेल, कारण संघातील स्टार गोलंदाज फर्ग्युसन दुखापतीच्या कारणाने बाहेर झाला आहे. संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी माहिती दिली आहे की, त्याची दुखापत गंभीर आहे आणि तो स्पर्धेच्या शेवटपर्यंत ठीक होणे अवघड आहे. तसेच केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. पंजाबने 5 सामन्यांमधील 3 सामने जिंकले आहेत, तसेच केकेआरने 6 मधील 3 सामने जिंकले आहेत. नेट रन रेटच्या आधारावर केकेआर पंजाबच्या पुढे आहे. केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर तर पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे.

फर्ग्युसन दुखापतीच्या कारणाने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला हैदराबाद विरुद्धच्या मागच्या सामन्यात दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला होता. त्याच्याजागी श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये जेवियर बार्टलेटला संघात स्थान देऊ शकतो.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्स: सिमरन सिंह (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, प्रियांश आर्य, ग्लेन मैक्सवेल, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, मार्को यान्सन, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, जेवियर बार्टलेट.

कोलकाता नाईट रायडर्स: क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक), अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मोईन अली, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

आज चंदीगडमध्ये ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस पडण्याची शक्यता नाही. सामन्यादरम्यान तापमान 30°c राहू शकते. पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---