---Advertisement---

Mi vs DC: अरुण जेटली स्टेडियमवर कोण मारणार बाजी – फलंदाज की गोलंदाज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

On: रविवार, एप्रिल 13, 2025 5:06 PM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघात आज डबल हेडर मधील दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा त्यांचा हा घरेलु मैदानावरचा पहिला सामना असणार आहे. जाणून घ्या की खेळपट्टीचा अंदाज कसा असेल? तसेच दोन्ही संघाचे हेड टू हेड आंकडे काय सांगतात.

या हंगामा बद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली कॅपिटल्स एकमेव असा संघ आहे, ज्याने आत्तापर्यंत एकही सामना गमावला नाही. 4 मधील 4 सामने जिंकून अक्षर पटेलची दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलवर टॉपच्या स्थानी आहे. तसेच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाची अवस्था खूप खराब आहे. त्यांनी 5 मधील 4 सामने गमावून संघ पॉइंट्स टेबलवर 9व्या स्थानावर आहे.

दिल्लीने या स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण 89 सामने खेळले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 42 तसेच प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने येथे 46 सामने जिंकले आहेत. याचबरोबर टॉस जिंकणाऱ्या संघाने 45 तर टॉस हरणाऱ्या संघाने 43 सामने जिंकले आहेत.

एकूण सामने: 35
दिल्ली विजय- 16
मुंबई विजय- 19

दिल्लीच्या स्टेडियमची बॉउंड्री लहान आहे. त्यामुळे येथे फलंदाजाना अधिक मदत मिळू शकते. आज मोठी धावसंख्या या मैदानावर पहायला मिळू शकते. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. फिरकीपटूंच्या तुलनेत आज वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---