आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघ नेहमीच स्पष्ट रणनीती घेऊन येतो. हा संघ प्रत्येक लिलावात आवश्यक असलेल्या खेळाडूंच्या मागे धावतो. यंदाच्या लिलावातही असेच काहीसे पाहायला मिळाले. 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जने एकूण 6 खेळाडू खरेदी केले, ज्यात तीन भारतीय आणि तीन परदेशी खेळाडू होते.
चेन्नई सुपर किंग्जने या 6 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी एकूण 30.40 कोटी रुपये खर्च केले आणि तरीही त्यांच्या पर्समध्ये एकूण 1 कोटी रुपये शिल्लक होते. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी आयपीएल 2024 साठी या 6 खेळाडूंचा त्यांच्या संघात समावेश केल्यानंतर काय सांगितले ते सांगतो. मात्र, त्याआधी एमएस धोनी याच्या संघाने यंदाच्या लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूंबद्दल पाहू.
डॅरेल मिचेल (न्यूझीलंड) – अष्टपैलू – 14 कोटी
समीर रिझवी (भारत) – फलंदाज – 8.40 कोटी
शार्दुल ठाकूर (भारत) – अष्टपैलू – 4 कोटी
मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश) – गोलंदाज – 2 कोटी
रचिन रवींद्र (न्यूझीलंड) – अष्टपैलू – 1.80 कोटी
अरावेल्ली अवनीश (भारत) – यष्टिरक्षक – 20 लाख
या लिलावात उतरण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जकडे जास्तीत जास्त 6 खेळाडू खरेदी करण्याचा पर्याय होता, ज्यामध्ये जास्तीत जास्त 3 विदेशी आणि 3 भारतीय खेळाडू असणे बंधनकारक होते. त्यानुसार, सीएसकेने 3 भारतीय आणि 3 परदेशी खेळाडूंना खरेदी करून 25 खेळाडूंचा आपल्या संघात समावेश केला आहे. या नेत्रदीपक लिलावाची सांगता झाल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन म्हणाले, “मला वाटते की, आजचा दिवस आमच्यासाठी खूप भाग्याचा होता, कारण आम्हाला जे खेळाडू हवे होते तेच खेळाडू खरेदी करण्यात आम्ही यशस्वी झालो. जसे की आम्हाला बेन स्टोक्स, (Ben Stokes) ड्वेन प्रिटोरियस,(Dwayne Pretorius) काइल जेम्सन (Kyle Jameson) यांच्या बदली मिळाल्या. अष्टपैलू खेळाडू मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो. डॅरिल मिचेल आणि रचिन रवींद्र यांना मिळाल्याने आम्ही खूश आहे.”
ते पुढे म्हणाला, “याशिवाय आम्हाला मथिशा पाथिराना (Mathisha Pathirana) याचा बॅकअप म्हणून मुस्तफिझूर रहमान ( Mustafizur Rahman) मिळाला आहे. संघ व्यवस्थापनाला हेच हवे होते. त्यामुळेच आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आम्हाला हवे ते खेळाडू मिळाले. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) संघात परतला आहे. तो आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. मला वाटते की, आम्हाला शार्दुल अतिशय वाजवी किमतीत मिळाला आहे, कारण आम्हाला अपेक्षा होती की तो अष्टपैलू खेळाडूंमध्ये खूप महाग असेल. शार्दुल परत आल्याने मला खूप आनंद झाला आहे, त्याने सीएसकेसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे आणि मला खात्री आहे की तो चांगली कामगिरी करत राहील.”
समीर रिझवीबद्दल बोलताना, ते पुढे म्हणाले, “संघ व्यवस्थापनाने समीर रिझवी (Sameer Rizvi) याला अनेक देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना पाहिले होते, त्यामुळे आम्हाला वाटले की, तो आमच्या फलंदाजीसाठी चांगला बॅकअप असेल. तो आमच्यासाठी भाग्यवान आहे. आम्ही यशस्वी झालो कारण महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने मागणी केलेले खेळाडू आम्हाला मिळाले आहेत. आम्हाला आशा आहे की, आमचा संघ या संयोजनासह चांगली कामगिरी करेल.” (Whoever Dhoni asked for we bought CSK CEO’s big reaction after the auction)
आयपीएल 2024साठी चेन्नई सुपर किंग्स संघ-
अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चाहर, डेवाॅन कॉनवे, महेश थिकशाना, मथिशा पाथीराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरकेकर, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, अविनाश राव अरावली, डॅरेल मिचेल, मुस्तफिजुर रहमान,
हेही वाचा
IPL लिलावात 20.50 कोटी घेणाऱ्या कमिन्सला घरचा आहेर; दिग्गज म्हणाला, ‘तो तर कसोटी प्लेअर…’
‘जर रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार असता, तर मी…’, सुरेश रैनाचं स्टेटमेंट तुफान व्हायरल