स्टार फलंदाज बाबर आझमनं पाकिस्तानचं कर्णधारपद का सोडलं, यामागचं कारण आता समोर आलं आहे. बाबर आझमनं अलीकडेच मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता समोर आलं आहे की, संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये बाबरचा कर्णधारपदावरून भ्रमनिरास झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकानंतर बाबरचा कर्णधारपदावरून भ्रमनिरास झाल्याचं स्पष्ट झालं होतं. पाकिस्तान टी20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतूनच बाहेर पडला होता. बाबर आझम कोच कर्स्टन आणि सहाय्यक प्रशिक्षक अझहर महमूद यांच्या शिफारशींनी खूश नव्हता. त्याला वाटलं की संघाच्या निराशाजनक कामगिरीसाठी तोच जबाबदार आहे. कर्स्टनच्या अहवालातील काही भाग सार्वजनिक झाल्यानंतर बाबरनं क्रिकेट बोर्डाला सूचित केलं की त्याला कर्णधारपदी राहण्यात रस नाही.
बोर्डाला दिलेल्या अहवालात कर्स्टन यांनी ड्रेसिंग रूममधील वातावरण तसेच इंग्लंडमध्ये काही खेळाडूंचं वर्तन, असहकार आणि टी20 विश्वचषकाबाबतही चर्चा केली. बाबरच्या कर्णधार म्हणून दडपण हाताळण्याच्या क्षमतेनं कर्स्टन फारसे प्रभावित नव्हते. बोर्डानं भूतकाळातील कामगिरीचा विचार केला नाही आणि त्याला योग्य पाठिंबा दिला नाही, असं बाबरनं म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी फलंदाज मुदस्सर नजर यांनी बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातील वाढत्या तणावासाठी पीसीबीला जबाबदार धरलं असून बोर्डानं कर्णधाराला पाठिंबा द्यावा, असं म्हटलं आहे. मुदस्सर म्हणाले की, ही सर्व आमचीच करणी असून कर्णधाराला दीर्घ काळ संधी द्यायला हवी. नवा कर्णधार बनवल्यास त्यालाही वेळ द्यायला हवा, असं त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा –
मुकेश कुमारचे 5 बळी, ऋतुराज गायकवाड फ्लॉप; इराणी चषकाच्या तिसऱ्या दिवशी काय घडलं?
“हे पूर्णपणे खोटं आहे”, हरभजन सिंगच्या धोनीवरील वक्तव्यावर सीएसकेच्या स्टाफचं उत्तर
“विराट कोहलीचा हा शेवटचा इंग्लंड दौरा असेल”, महान गोलंदाजाची धक्कादायक भविष्यवाणी