डॅनियल व्हिटोरी हा एक दिग्गज फिरकी गोलंदाजांपैकी एक म्हणून कायम ओळखला जात असे. अतिशय सभ्य क्रिकेटपटू असल्याकारणाने त्याचे जगात अनेक चाहते आजही आहेत. आणखी एका खास गोष्टीसाठी हा क्रिकेटपटू ओळखला जायचा ती गोष्ट म्हणजे तो चष्मा घालून क्रिकेट खेळत असे.
अनेक लोक हे कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात कारण या लेन्समधून आपण कोणत्याही कोनातून पाहू शकतो. तसेच अगदी साध्या डोळ्यांनी जेवढे आपण पाहू शकतो तेवढे याने कॉन्टॅक्ट लेन्सही पाहू शकतो. तर चष्मा वापरताना काही मर्यादा येतात. खेळाडूला चांगले आणि स्पष्ट दिसणे हे खेळात अतिशय गरजेचे असते. त्याचमुळे व्हिटोरीच्या चाहत्यांना नेहमीच प्रश्न पडत असे की हा लेझर सर्जरी किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या काळातही चष्मा लावून का खेळत असावा.
तर त्यामागील खास कारण म्हणजे व्हिटोरी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून चष्मा वापरत आहे. आणि त्याचा हा चष्मा जेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळत असे तेव्हाही तसाच कायम राहिला. त्यानंतर पुढे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याला हीच सवय कायम राहिली.
व्हिटोरीला चष्मा घालून खेळताना कोणतीही अडचण येत नाही. काही लोकांनी व्हिटोरीवर आरोप केला होता की त्याला चष्म्याच्या स्पॉन्सरशिपसाठी पैसे मिळतात म्हणून तो जाणूनबुजून खेळताना चष्मा वापरतो. परंतु या खेळाडूचे याचे खंडन करत आपण पैश्यांसाठी चष्मा वापरत नसल्याचे स्पष्ट केले.
व्हिटोरी ११३ कसोटी, २९५ वनडे आणि ३४ टी२० सामने खेळला आहे. ज्यात त्याने एकूण ६९८९ धावा केल्या आहेत तर गोलंदाजी करताना ७०५ विकेट्स देखील घेतल्या आहेत.