भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने 2022मध्ये दमदार पुनरागमन केले. त्याचा फॉर्म वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही विराट संघर्ष करताना दिसत आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यात विराटला खास कामगिरी करता आली नाही. तो झटपट विकेट गमावून बसला. दोन्ही सामन्यात विराट फिरकीविरुद्ध टिकू शकला नाही. कसोटीत सातत्याने फ्लॉप होत असलेल्या विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेतील विराट कोहली (Virat Kohli) याच्या खराब प्रदर्शनामुळे त्याच्यावर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना राजकुमार म्हणाले की, विराटला बांगलादेशमध्ये खेळताना इरादा स्पष्ट करून खेळले पाहिजे होते, ज्याप्रकारे तो बाद झाला, ते अस्वीकार्य होते.
विराट कोहलीवर भडकले बालपणीचे प्रशिक्षक
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या बालपणीचे प्रशिक्षकांनी पुढे म्हटले की, विराट स्वीपसारखे रचनात्मक फटक्यांचा वापर करून मोकळेपणाने खेळू शकला असता. ते म्हणाले, “एक फलंदाज बाद झाल्यानंतर खूपच निराश होतो. विराट कोहली स्वभावाने खूपच आक्रमक आहे. मात्र, ज्याप्रकारे तो बाद होत आहे, ते अस्वीकार्य आहे. बांगलादेशच्या फिरकीपटूंविरुद्ध त्याच्या बरोबरीच्या फलंदाजांना संघर्ष करताना पाहणे दुर्दैवी आहे. त्याने आपला इरादा स्पष्ट करायला पाहिजे होता.”
विराट कोहलीच्या बाद होण्याच्या पद्धतीवर प्रतिक्रिया देताना राजकुमार पुढे म्हणाले की, “यार्डाच्या आत मिड-ऑन आणि मिड-ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षकांसोबत, तो आणखी मोकळेपणाने खेळू शकला असता. जोपर्यंत तुम्ही कोणत्याही फिरकीपटूला त्रास देत नाहीत, तो तुम्हाला खेळू देणार नाही. तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची गरज आहे. जसे की, स्लॉग स्वीप खेळणे किंवा बाहेर जाणाऱ्या चेंडूला स्वीप करणे.”
विराट बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या बॅटमधून छाप सोडण्यात अपयशी ठरला. त्याने 4 डावांमध्ये फक्त 45 धावांचे योगदान दिले. त्याने दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात 24 धावा आणि शेवटच्या डावात 1 धाव काढली. यादरम्यान त्याची सरासरी ही फक्त 15 होती. अशात चाहते विराट कसोटीमध्येही फॉर्मात कधी येतो याची वाट पाहत आहेत. (why did former captain virat kohlis childhood coach rajkumar sharma get angry)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कर्णधार एक सांगतो अन् खेळाडू करतात एक”, संघ सहकारीच टीम इंडियावर भडकला
सुनील गावसकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास