भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंघम येथे पार पडलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. चौथा दिवस संपेपर्यंत भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता. परंतु पाचव्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही आणि शेवटी सामना अनिर्णित राहिला. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन केले. तरीही त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. याच नेमकं कारण काय? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
जसप्रीत बुमराहने नॉटिंघम कसोटीतील गोलंदाजी कामगिरी पाहता सामनावीर पुरस्काराचा प्रबळ दावेदार होता. असे असूनही इंग्लंडचा कर्णधार जो रूटची सामनावीर म्हणून निवड झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. जो रूटने पहिल्या डावात अर्धशतक (64 धावा)आणि दुसऱ्या डावात शतक (109 धावा) झळकावले होते. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने सामन्यात एकूण 9 बळी घेतले होते. त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेतले होते. आता प्रश्न असा आहे की, इतकी उत्कृष्ट कामगिरी करूनही जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कार का मिळाले नाही?
नॉटिंघमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती आणि येथे धावा करणे थोडे कठीण होते. फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावणे कठीण जात होते. असे असूनही इंग्लंडच्या कर्णधाराने दोन्ही डावांमध्ये आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात फक्त 183 धावा केल्या. त्यामध्ये रूटने 64 धावांचे योगदान दिले होते. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही इंग्लंडचा दुसरा कोणताही फलंदाज 40 चा आकडा गाठू शकला नाही. मात्र रूटने त्यात 109 धावांची आकर्षित खेळी खेळली. यामुळेच रूटला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
दुसरीकडे जसप्रीत बुमराहची कामगिरी भारतीय संघासाठी मोठा दिलासा आहे. कारण त्याला शेवटच्या तीन कसोटी डावांमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही नव्हती.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांवर रोखले होते. त्यानंतर इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना 278 धावा करत भारताने पहिल्या डावात 95 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 303 धावांवर गुंडाळले आणि भारतीय संघाला 209 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाअखेर भारताने 1 गडी गमावून 52 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी फक्त 157 धावांची गरज होती. पण पावसाने भारतीय संघाच्या आशा पाण्यात मिळवल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच की! रुटने जेव्हा ‘अशी’ कामगिरी करतो, तेव्हा इंग्लंड कधीच पराभूत होत नाही, वाचा सविस्तर
WTC फायनलमध्ये अपयश येऊनही गोलंदाजीत फारसा बदल नाही, पण ‘या’ गोष्टीत मात्र बदल केला, बुमराहचा खुलासा
‘फॅब फोर’मध्ये असला तरी स्मिथला चार गोलंदाजांचे येते टेंशन, ‘या’ भारतीयाचाही त्यात समावेश