---Advertisement---

राजस्थान रॉयल्सला राहुल द्रविड यांचा अचानक रामराम, जाणून घ्या नेमकं खरं कारण काय?

On: शनिवार, ऑगस्ट 30, 2025 10:37 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर राहुल द्रविडने (Rahul Dravid) पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan royals) संघाची धुरा हाती घेतली होती. आयपीएल 2025 (IPL 2025) च्या तयारीसाठी त्यांनी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडलाही सोबत आणले. मात्र या दोघांची उपस्थिती असूनही संघाचं प्रदर्शन अत्यंत निराशाजनक ठरलं. राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत नवव्या स्थानावर फिनिश केलं. त्यानंतर आता आयपीएल 2026 च्या तयारीपूर्वी राहुल द्रविड यांनी राजस्थान संघाला रामराम केला आहे. चाहत्यांना या निर्णयाने आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या (RR) संघाने आता आयपीएल 2026 साठी तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला. मॅनेजमेंट द्रविड यांना मोठी जबाबदारी देऊ इच्छित होतं, पण राहुल यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत एक नवा चेहरा हवा होता.

याबाबत राजस्थान रॉयल्सने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राहुल द्रविड हे अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्सच्या प्रवासाचा एक महत्त्वाचे भाग राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाने खेळाडूंच्या एका पिढीला प्रेरित केलं, संघात मजबूत मूल्यं रुजवली आणि फ्रेंचायझीच्या संस्कृतीवर खोल ठसा उमटवला. फ्रेंचायझीच्या रचनेच्या पुनरावलोकनादरम्यान राहुल यांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---