भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. पर्थ कसोटीचा पहिला दिवस पूर्णपणे वेगवान गोलंदाजांच्या नावावर होता. प्रथम टीम इंडियाचे फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले. भारताच्या एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आलं नाही. यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाजही फ्लॉप ठरले.
या घसरगुंडीनंतर आता टीम इंडियाच्या फलंदाजीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावरही भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध टिकाव धरू शकले नव्हते. आता त्यांनी वेगवान गोलंदाजांसमोरही हार मानली आहे. यामुळे भारतीय फलंदाज सातत्यानं अपयशी का होत आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हे असं का होत आहे याची तीन मोठी कारणे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
(3) अनुभवाची कमतरता – भारतीय संघाच्या या फ्लॉप कामगिरीमागचं प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांमधील अनुभवाची कमतरता. विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू वगळता भारताच्या बाकीच्या फलंदाजांना तेवढा अनुभव नाही. यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल यांसारखे खेळाडू अशा परिस्थितीत जास्त खेळलेले नाही. त्यामुळे भारतीय संघाची ही अवस्था होत आहे.
(2) सरावाचा अभाव – भारतीय फलंदाजांमध्येही सरावाचा अभाव ठळकपणे दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियानं एकही सराव सामना खेळला नाही. भारताचा सराव सामना आयोजित करण्यात आला होता, परंतु तो नंतर रद्द झाला. त्यानंतर भारतीय खेळाडू आपापसात खेळले. जेव्हा तुम्ही परदेश दौऱ्यावर जाता आणि कोणताही सराव सामना खेळत नाही, तेव्हा सामन्यादरम्यान फलंदाजीची अशी अवस्था होणारच आहे. या खेळपट्टीवर हे खेळाडू सराव सामने खेळले असते, तर ते येथे स्वतःला जुळवून घेऊ शकले असते.
(1) फलंदाजांचा दृष्टिकोन बदलला – अलीकडच्या काही वर्षांवर नजर टाकली तर भारतीय फलंदाजांच्या दृष्टिकोनात बरेच बदल झाले आहेत. आता टीम इंडियाचे फलंदाज क्रीजवर टिकून राहून खेळण्याचा प्रयत्न करत नाहीत. उलट जो खेळाडू येतो त्याला झटपट फटके मारायचे असतात. यामुळे अनेक वेळा फलंदाज विकेट गमावतात. जोपर्यंत तुम्ही क्रीजवर वेळ घालवत नाही तोपर्यंत तुम्ही स्वत:ला व्यवस्थित सेट करू शकणार नाही. भारतीय फलंदाजांचं फ्लॉप होण्यामागचं हे सर्वात मोठं कारण आहे.
हेही वाचा-
44 वर्षात असं केवळ दुसऱ्यांदा घडलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या नावे लाजिरवाणा विक्रम
डेल स्टेननंतर अशी कामगिरी करणारा बुमराह केवळ दुसरा गोलंदाज! 10 वर्षांत हे प्रथमच घडलं
पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट पडल्या! अखेरच्या सत्रात भारताचा जोरदार कमबॅक