इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी मेगा लिलावासाठी नोंदणी केली आहे. 42 वर्षीय अँडरसननं वर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली.
विशेष म्हणजे, अँडरसननं शेवटचा टी20 सामना 2014 मध्ये खेळला होता. तो यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. आता त्यानं 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणाऱ्या मेगा लिलावासाठी स्वतःची नोंदणी केली आहे. अँडरसननं त्याची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये ठेवली आहे.
इंग्लंडकडून 188 कसोटी सामन्यांत 704 विकेट घेतललेल्या अँडरसननं वर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन (800) आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकी जादूगार शेन वॉर्न (708) यांच्यानंतर कसोटीत तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
अँडरसननं बीबीसी रेडिओ 4 टुडेच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, त्याच्यात अजूनही काहीतरी शिल्लक आहे ज्यामुळे त्याला वाटतं की तो आणखी खेळू शकतो. अँडरसन म्हणाला की तो कधीही आयपीएलमध्ये खेळला नाही. त्यानं हे कधीच अनुभवलं नाही. त्याला वाटतं की एक खेळाडू म्हणून त्याच्यामध्ये बरंच काही बाकी आहे.
अँडरसननं म्हणाला की जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये खेळून त्याला फक्त एक गोलंदाज म्हणून आपलं ज्ञान वाढवायचं नाही तर प्रशिक्षक म्हणून अधिक अनुभव आणि ज्ञान मिळवायचं आहे. हा वेगवान गोलंदाज म्हणाला की त्यानं उन्हाळ्यात आपल्या दीर्घ कारकीर्दीला पूर्णविराम दिल्यानंतर थोडं प्रशिक्षण घेतलं आहे. तो सध्या इंग्लंड संघासोबत ‘मेंटॉर’ म्हणूनही काम करत आहे.
अँडरसन म्हणाला की त्याच्या मते अशा लीगमध्ये खेळणं आणि अनुभव मिळवणं याद्वारे त्याला या खेळाबद्दलचं ज्ञान वाढवण्यास मदत होईल ज्याचा त्याला भविष्यात फायदा होईल. अँडरसननं ऑगस्ट 2014 मध्ये त्याचा काउंटी संघ लँकेशायरसाठी शेवटचा टी20 सामना खेळला होता. तर त्यानं इंग्लंडसाठी शेवटचा टी20 सामना नोव्हेंबर 2009 मध्ये खेळला होता.
हेही वाचा –
भारतीय फलंदाज सराव सामन्यातही ढेपाळले, बॉर्डर-गावस्कर मालिकेत काय होणार?
रणजी सामन्यातील निर्णयावर संतापला ऋतुराज गायकवाड, व्हिडिओ शेअर करून विचारले बोचरे प्रश्न
मुंबई इंडियन्सनं हरमनप्रीतसह 14 खेळाडूंना रिटेन केलं, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या