भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. उभय संघातील बॉर्डर-गावस्कर मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. मात्र या मालिकेत अनुभवी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल संघातील आपली जागा राखू शकेल की नाही? हा मोठा प्रश्न आहे.
आकडेवारीनुसार, केएल राहुलचा अलीकडचा फॉर्म खूपच खराब राहिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फ्लॉप शोनंतर त्यानं ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धही निराशा केली. अशा परिस्थितीत केएल राहुलला लवकरच टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. टीम मॅनेजमेंट राहुलला भारतीय संघातून का वगळू शकते? याची 3 प्रमुख कारणं आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
फलंदाज म्हणून सतत फ्लॉप होणं – केएल राहुल एक फलंदाज म्हणून सतत फ्लॉप ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर राहुल ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यातही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुल ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध नक्कीच फॉर्ममध्ये परत येईल, अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. मात्र त्यानं पुन्हा एकदा निराशा केली. केएल राहुलचा फॉर्म ज्या प्रकारे सुरू आहे, ते पाहता त्याला भारतीय संघातून वगळलं जाण्याची शक्यता आहे.
ध्रुव जुरेलची दमदार कामगिरी – एकीकडे केएल राहुल सातत्यानं निराश करत आहे, तर दुसरीकडे युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सातत्यानं दमदार कामगिरी करतोय. इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या मालिकेत शानदार खेळी केल्यानंतर जुरेलने ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध देखील आपली प्रतिभा सिद्ध केली. तो ऑस्ट्रेलियाच्या कठीण खेळपट्ट्यांवर धावा करणारा एकमेव भारतीय खेळाडू होता. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट रिषभ पंतनंतर दुसरा यष्टिरक्षक म्हणून केएल राहुलऐवजी ध्रुव जुरेलला पसंती देऊ शकते, असं मानलं जातंय.
सलामीला यशस्वी जयस्वालची जागा पक्की – यशस्वी जयस्वालनं कसोटी पदार्पणापासूनच सलामीला येत शानदार कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत त्याची जोडी चांगली जमली आहे. कसोटीमध्ये सलामीला खेळताना केएल राहुलचे आकडे चांगले आहेत. मात्र यशस्वी जयस्वालनं सातत्यानं चांगली कामगिरी करून ही जागा आपल्या नावे केली. याशिवाय युवा शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर सातत्यपूर्ण फलंदाजी करतोय. अशा परिस्थितीत केएल राहुलसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं सोपं जाणार नाही.
हेही वाचा –
हेड कोच गौतम गंभीर विरुद्ध कट केला जातोय? माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ
“न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवासाठी मी जबाबदार”, दिग्गज खेळाडूची धक्कादायक कबूली
पाकिस्ताननं इतिहास रचला! तब्बल इतक्या वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा मायदेशात पराभव