---Advertisement---

फलंदाजी करण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये बॅट खाताना दिसला धोनी, असे का करतो थाला? घ्या जाणून

On: सोमवार, मे 9, 2022 2:45 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल २०२२मधील ५५व्या सामन्यात शानदार खेळ खेळला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अफलातून खेळ दाखवत त्यांनी दिल्लीला ९१ धावांनी पराभूत केले. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने छोटेखानी पण नेत्रदिपक खेळी केली. दरम्यान तो फलंदाजीसाठी मैदानावर येण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये त्याची बॅट चावताना दिसला होता. यानंतर चाहते विचारात पडले आहेत की, धोनीने असे का केले असावे.

माजी भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा (Amit Mishra) याने चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. धोनीला (MS DHoni) त्याची बॅट स्वच्छ ठेवायला आवडते. त्यामुळे तो सतत दाताने त्याची बॅट चावत (Why Dhoni Chew His Bat) त्याच्यावरील टेप काढत असतो. याचमुळे धोनी सामन्यापूर्वी बॅट (MS Dhoni Chewing His Bat) खाताना दिसतो. मिश्राने ट्वीटरद्वारे याबद्दल खुलासा केला आहे.

https://twitter.com/Im_Perfect45/status/1523325474805456896?s=20&t=CnvWoD3m6XjvaO-ivJmkmw

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यानंतर ट्वीट करत मिश्राने लिहिले की, ‘तुम्ही विचारात पडला असाल की, धोनी नेहमी त्याची बॅट का चावत असतो. तर तो त्याची बॅट स्वच्छ ठेवण्यासाठी असे करतो. कारण त्याला त्याची बॅट स्वच्छ ठेवायला आवडते. तुम्हाला त्याच्या बॅटमधून कधीच एखादा तुकडा किंवा दोरी बॅटमधून निघालेली दिसणार नाही.’ धोनी आयपीएलपूर्वी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळताना बऱ्याचदा ड्रेसिंग रूममध्ये आपली बॅट चावताना दिसला आहे.

दरम्यान धोनीने दिल्लीविरुद्ध धुव्वादार खेळी करत आपला जुना फॉर्म दाखवला. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १ चौकार मारत नाबाद २१ धावा फटकावल्या. त्याची ही छोटेखानी संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण राहिली. फलंदाजीव्यतिरिक्त धोनीने या सामन्यादरम्यान यष्टीमागे २ झेलही टिपले आणि संघाला २ विकेट्स मिळवून देण्यात योगदान दिले.

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर २०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १७.४ षटकातच ११७ धावांवर सर्वबाद झाला. हा चेन्नईचा हंगामातील चौथा विजय होता. त्यांनी ११ सामने खेळताना ७ सामने गमावले आहेत, तर ४ जिंकले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘ड्रेसिंग रूममध्ये बसल्याने फॉर्म परत मिळणार नाही’, विराटला ब्रेक देण्याच्या चर्चांवर गावसकरांचे मोठे विधान

पंचांमुळे वॉर्नर वाचवू शकला नाही आपली विकेट, बाद झाल्यानंतर असा व्यक्त केला राग- Video

‘द वाॅल’ राहुल द्रविड चक्क दिसणार भाजपच्या मंचावर, पाहा काय आहे नक्की प्रकरण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---