‘दुनिया हिला देंगे’ चा नारा देत, आपली सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशानेच, आयपीएल २०२२ च्या रणांगणात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या स्वप्नांचा जबर चुराडा झाला. सलग पहिल्या आठ मॅचेस हरल्याने त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. आजवर इतके यश पाहिलेल्या टीमकडून अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. मात्र, झालं गेलं गंगेला मिळालं, असं म्हणत त्यांनी नंतर पाचपैकी तीन मॅचेस जिंकल्या. आता फक्त एक मॅच शिल्लक आहे. दरम्यान मुंबईने काही नव्या प्लेअर्सना संधी दिली. कोणी यशस्वी ठरल तर कोणी अपयशी. मात्र, या साऱ्यात एक प्लेयर बेंचवर बसून राहिला.
खरंतर तो गेल्या वर्षीही मुंबईच्या संघात होता. तेव्हाही त्याचा डेब्यू झाला नाही आणि आताही. त्याचं नाव अर्जुन सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा मुलगा. स्वतः वडील त्या डग आऊटमध्ये असताना अर्जुनला संधी का मिळत नाही? याचे उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही केला, आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो.
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत, रक्तातच क्रिकेट असल्याने अर्जुनही क्रिकेटर बनला ही बातमी तितकी काही मोठी वाटली नव्हती. या आधी कितीतरी बाप-लेकांनी भारतासाठी क्रिकेट खेळलंय. त्यामुळे अर्जुन क्रिकेटर झाला यात खास असं काहीच नव्हतं. मात्र, तो ऑलराऊंडर झालाय आणि त्यातही फास्ट बॉलिंग करतोय म्हटल्यावर डोळे लकाकले.
जेव्हा सचिन रिटायर झाला त्याच्या, सहा महिन्यात अर्जुन मुंबईच्या अंडर १४ टीमकडून खेळू लागलेला. इतरांपेक्षा अधिकची उंची, डाव्या हाताने फास्ट बॉलिंग, आणि जोडीला तुफान बॅटिंगच स्किल. अर्जुन चर्चेत येऊ लागला. बापाची जागा चालवणार असे म्हटले जाऊ लागले. असे असतानाच अर्जुनला आणि त्याच्या टॅलेंटला ओळख मिळाली ती २०१७ मधल्या एका घटनेने. एमसीसी युथसाठी खेळताना त्याला इंग्लंडच्या सीनियर टीमसोबत सरावाची संधी मिळालेली. तो नेटमध्ये बॉलिंग करत असताना, बॅटिंगला आला जॉनी बेअरस्टो. एक दोन बॉल सहज टाकले गेले आणि नंतर अर्जुनने एखाद्या मिसाईलप्रमाणे यॉर्कर मारला. थेट बेअरस्टोच्या अंगठ्यावर. बेअरस्टो सरावातूनच बाहेर गेला. तिथेच कळलं कुछ तो बात है अर्जुन में. पुढे टीम इंडियाच्या बॅटर्सला बॉलिंग करायची संधीही त्याला मिळाली.
हेही पाहा- अर्जुन तेंडूलकरमध्ये प्रतिभा असूनही तो कायम डगआऊटमध्ये का असतो?
२०१८ ला अर्जुन इंडियासाठी अंडर नाईन्टीन खेळला, पण काही महिन्यांमुळे त्याची वर्ल्डकप वारी हुकली. पुढच्या वर्षी मुंबईत मुंबई टी२० लीग नावाची टूर्नामेंट झाली. तिथे अर्जुन चमकला बॅटनेही आणि बॉलनेही. प्रतितास १५० किमीचे बॉल टाकून त्याने साऱ्यांना चकित केले.
२०२१ मध्ये वडिलांप्रमाणेच मुंबईसाठी टॉप लेव्हलचे क्रिकेट खेळण्याचे भाग्य त्याला लाभले. अर्जुनने मुंबईसाठी डेब्यू केला. तेवढ्यात आयपीएलचा लिलाव झाला आणि सचिनच मेंटर असलेल्या मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखांच्या बेस प्राईसमध्ये संघात सामील करून घेतले. सिझन संपायच्या अगदी काही दिवस आधी तो एन्जर्ड होऊन बाहेर झाला. डेब्यू न करताच.
यावर्षी पुन्हा त्याला मुंबईनेच खरेदी केले. मुंबई ८ मॅच हरल्याने टूर्नामेंटमधून बाहेर झाली. आता मॅनेजमेंट पुढच्या वर्षीसाठी यंग प्लेयर्सला संधी देणार असे सांगण्यात आले. अर्शद खानच्या जागी आलेल्या कुमार कार्तिकेयला कॅम्प जॉईन करताच सरळ इलेव्हनमध्ये घेतले. तो ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत उतरतोय कुठे नाही की मॅच खेळला. ऋतिक शौकीन, ब्रेविस, रमनदीप सारेजण खेळले. फक्त अर्जुन सोडून. अर्जुनचे केवळ नेटमध्ये धारदार यॉर्कर टाकल्याचे व्हिडिओ शेअर केले गेले.
भारतात सहजासहजी सापडत नाही ते, फास्ट बॉलर प्लस हिटिंग बॅटर हे कॉम्बिनेशन अर्जुनकडे आहे. फक्त वडील डगआउटमध्ये आहेत आणि टीका होईल म्हणून अर्जुनला संधी मिळत नसेल तर, त्याच्यासारखा टॅलेंटेड क्रिकेटरवर हा नक्कीच अन्याय आहे.
अर्जुनसोबत अंडर नाईन्टीन खेळलेले शॉ, गिल, पडीक्कल इंडियन टीममध्ये खेळतात. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल टीम इंडियाच्या उंबरठ्यावर आहेत. या साऱ्यात, कदाचित तितकच टॅलेंट असलेला अर्जुन अजूनही मात्र एका संधीसाठी धडपडतोय. ती एक संधी कमीतकमी त्याला, शेवटच्या लीग मॅचमध्ये मिळावी असेच त्याच्या चाहत्यांना वाटतेय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय खेळाडूंच्या जर्सी नंबरमागील फंडा आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर
तब्बल ३४ वर्षे जुन्या प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धूंना तुरुंगवासाची शिक्षा, काय होतं ते प्रकरण?
दुर्दैवी! असा मृत्यू कोणाचाही होऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूंना अपघातात गमवावा लागलाय जीव