भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा व नवदीप सैनी यांना अनुक्रमे मयंक अगरवाल व उमेश यादवच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. रोहितचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात होते, मात्र सैनीच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह होते. अनेक क्रिकेट रसिक शार्दुल ठाकुर व टी नटराजनच्या समावेशाची मागणी करत होते. मात्र कर्णधार अजिंक्यने सैनीला पसंती दिली आहे. सैनीला पसंती देण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण सिडनीची खेळपट्टी असल्याचे स्पष्ट होत आहे.
सिडनी येथील खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी पोषक असते. अशा खेळपट्टीवर फलंदाजांना बाद करण्यासाठी वेगवान गती व बाऊंस मदतगार ठरतो. नटराजन व शार्दुलच्या तुलनेत सैनी जास्त वेगवान गोलंदाजी करू शकतो व त्याच्याकडे उत्तम बाउन्सर टाकण्याची कला देखील आहे. सैनीच्या या जमेच्या बाजूंमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला असू शकतो. आशिष नेहरा सारख्या अनेक दिग्गजांनी सैनीचा संघात समावेश करावा अशी मागणी केली होती.
सैनी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करणार असून, सर्वांनाच त्याच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 4 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत असून सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाकडून सर्वच क्रिकेट चाहत्यांना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS v IND : सिडनी कसोटीत पाऊस बनू शकतोय व्हिलन, वाचा वातावरणाचा अंदाज
बापरे…! तब्बल ११ खेळाडूंनी अजिंक्यच्या नेतृत्वात केले आहे आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण
का दिलं जातय स्मिथ आणि लॅब्यूशानेतील नात्याला ब्रोमान्सचं नाव? वाचा