---Advertisement---

ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? रिंगच्या रंगांचा अर्थ काय? सर्वकाही जाणून घ्या

On: रविवार, जुलै 14, 2024 3:35 PM
---Advertisement---

सध्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची तयारी जोरात सुरू आहे. ऑलिम्पिक खेळ 26 जुलैपासून सुरू होणार असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. यंदा या स्पर्धेत सुमारे 10 हजारहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

जर आपण ऑलिम्पिकच्या इतिहासावर नजर टाकली तर, ऑलिम्पिक खेळ 1896 मध्ये सुरू झाले होते. तुम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून ऑलिम्पिकच्या 5 वर्तुळाकार रिंग पाहिल्या असतील, जे या खेळांचं प्रतीक आहेत. आज हे खेळ सुरू होऊन शतकाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र एक मोठा प्रश्न उभा राहतो की, प्रतिक म्हणून फक्त 5 रिंग का? या रिंगचा अर्थ काय? चला तर मग, या बातमीद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.

डावीकडून उजवीकडे क्रमानं निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या या 5 रिंग्स आहेत. या 5 रिंग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOC) चे माजी अध्यक्ष पियरे डू कौबर्टिन यांनी तयार केल्या आहेत. या रिंग ऑलिम्पिक चळवळीचं प्रतिक आहे, जी अनेक वर्षांपूर्वी झाली होती. ऑलिम्पिक रिंग द्वारे जगातील पाच प्रमुख खंड दर्शवले जातात. हे पाच खंड आहेत – आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, युरोप आणि ओशनिया (ऑस्ट्रेलिया व आसपासचे देश).

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या 5 वेगवेगळ्या रिंगमध्ये वापरण्यात आलेल्या रंगाचा अर्थ काय? ऑलिम्पिक रिंगमध्ये निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल हे पाच रंग वापरण्यात आले आहेत. यामागचं कारण म्हणजे, हे सर्व रंग जगातील जवळजवळ प्रत्येक देशाच्या ध्वजांमध्ये आढळतात. त्यामुळे सर्व देशांची एकता आणि अखंडता राखण्यासाठी या 5 रंगांचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय ही पाच वर्तुळं जगभरातून या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंचंही प्रतिनिधित्व करतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा
रिकी पाँटिंगनंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक कोण बनेल? सौरव गांगुलीनं केला खुलासा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच 4 नवीन खेळांचा समावेश, उद्घाटन समारंभही असेल खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---