---Advertisement---

…बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉ का थांबला होता मैदानात???

---Advertisement---

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर 4 बाद 364 धावा केल्या आहे. या डावात 18 वर्षीय पृथ्वी शॉने आंतराष्ट्रीय पदार्पण करताना शतकी खेळी केली.

त्याने या सामन्यात 154 चेंडूत 134 धावांची शानदार शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार मारले. पण त्याला विंडिजच्या देवेंद्र बिशूने 51 व्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत बाद केले.

बाद झाल्याने शॉ नाराज झाला आणि काही काळ तसाच उभा राहिला. याबद्दल संजय मांजरेकर यांनी पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर शॉला विचारले. त्यावर शॉ म्हणाला, ‘खेळपट्टी चांगली होती. त्यामुळे फक्त तेवढे शतक करणे हे पुरेसे नव्हते. मला अजून फलंदाजी करायची होती.’

‘मी खूप नाराज झालो कारण दुसरे सत्र संपण्यासाठी केवळ 10 मिनिटे वेळ शिल्लक होता आणि मी स्वत:ला सांगत होतो की मला अजून 10 मिनिटे टिकून खेळ खेळायचा आहे.’

शॉने या सामन्यात चेतेश्वर पुजारा बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारीही केली होती. पुजाराने या सामन्यात 86 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.

पहिल्या दिवसाखेर भारताचा कर्णधार विराट कोहली 72 धावांवर तर बर्थडे बॉय रिषभ पंत 17 धावांवर नाबाद आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment